• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 'बंद करून दाखवले' याचेही श्रेय घेणार का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'बंद करून दाखवले' याचेही श्रेय घेणार का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Nitesh Rane letter to CM Uddhav Thackeray: भाजप आमदार नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा गटविमा बंद झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

  • Share this:
मुंबई, 11 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) एक पत्र लिहिलं आहे. गेल्या 15 दिवसांत नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे दुसरं पत्र आहे. या पत्रात नितेश राणे यांनी या पत्रातून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा गटविमा बंद झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. स्वत:चे कौतुक जसे जाहीर करवून घेतां तसे ही योजना बंद केल्याचे श्रेय ही घेणार का? असा सवालही या पत्रातून विचारला आहे. (Nitesh Rane writes to CM Uddhav Thackeray) हे आपणासा माहित नाही का? आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वताच्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून ‘मुंबई मॉडेल’ चीही जगभर वाहवा ‘मिळवून’ घेतात. पण जे खरे कोविड वॉरीअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पुर्णपणे बंद पाडण्यात आलीये. हे आपणासा माहित नाही का? मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार व कर्मचारी तसेच अधिकारी आणि 1 एप्रिल 2011 सालापासून सेवानिवृत झालेले कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वैद्यकीय गटविमा योजना सुरू केली होती. 1 ऑगस्ट 2015 साली ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्तीही करण्यात आली होती. सुरुवातीला 2015-16 व 2016-17 या दोन वर्षाच्या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन 2017-18 या तिसऱ्या वर्षात 1 ऑगस्ट 2017 ला बंद करण्यात आली. जी आजवर सुरु झालेली नाही. "बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठानलाच भ्रष्टाचाराचं केंद्र केलं जातयं" नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र आपल्याला हस्ते शुभारंभ केलेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, त्यामुळे आता आपणास स्मरण करून देण्याची वेळ आली आहे. सदरची योजना पुन्हा कार्यान्वित होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी स्वत: विमा काढलेला नाही. जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. पण त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वताच्या अर्थकारणासाठी खेळू नये. ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का? जेव्हा ही योजना सुरु केली तेव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते. आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का?
Published by:Sunil Desale
First published: