Home /News /mumbai /

पत्नी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार का? संजय राऊतांनी केले स्पष्ट

पत्नी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार का? संजय राऊतांनी केले स्पष्ट

'ईडी ही देशाची महत्त्वाची संस्था आहे. जर कुठला कागद हा माझ्या घरी येत असेल तर त्याचा आदर आहे'

    मुंबई, 29 डिसेंबर :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena Mp Sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने (ED) नोटीस बजावली आहे. आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने कळवले असल्याची माहिती आहे. मात्र, आम्ही दोन चार दिवसांचा वेळ मागितला आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी ईडीच्या नोटीसीवरून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'ईडी ही देशाची महत्त्वाची संस्था आहे. जर कुठला कागद हा माझ्या घरी येत असेल तर त्याचा आदर आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. माझ्याकडेही ईडीला देण्यासाठी बरीच कागदपत्र आहे. त्यामुळे नोटीसीला उत्तर हे नोटीसने दिले जाईल' असं राऊत म्हणाले. वर्षा राऊत यांना नोटीस देण्यात आली म्हणून त्या आज चौकशीला जाणार नाही. आम्ही ईडीकडे दोन-चार दिवसांची मुदत मागितली आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केले. 'आम्हाला जी नोटीस देण्यात आली आहे. ती मी अद्याप  पाहिली नाही. ती नोटीस पाहण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हे राजकारण कशा प्रकारे सुरू आहे, ते आम्हाला चांगले माहिती आहे.  माझ्याकडे भाजपच्या नेत्यांची यादी आहे. त्यांनी केलेल्या व्यवहाराची पूर्ण कागदपत्र तयार आहे. ही यादी दिल्यानंतर ईडीला जास्त काम मिळणार आहे, असंही राऊत म्हणाले. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाबाहेर लावले होर्डिंग दरम्यान, शिवसैनिकांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर सोमवारी रात्री होर्डिंग लावले आहे. 'ED येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात.' अशा आशयाचे होर्डिंग भाजप मुख्यलायाबाहेर लावण्यात आलेत. यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना मुंबईच्याय रस्त्यांवर पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी  मुंबईतील ईडीच्या कार्यालयाचे नावच बदलून टाकले. ईडीच्या कार्यालयावर हे 'भाजप प्रदेश कार्यालय' असं सांगत बॅनरच लावले  होते. शिवसैनिकाच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या