भाजी चिरण्याच्या चाकूने पतीच्या पोटावर केले 11 वार, नंतर गळाही कापला

भाजी चिरण्याच्या चाकूने पतीच्या पोटावर केले 11 वार, नंतर गळाही कापला

नालासोपारा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या पतीच्या पोटावर चाकूने तब्बल 11 वार केले. नंतर गळा कापून त्याची निर्घृण हत्या केली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट-नालासोपारा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या पतीच्या पोटावर चाकूने तब्बल 11 वार केले. नंतर गळा कापून त्याची निर्घृण हत्या केली आहे. घटनेनंतर मारेकरी महिलेने पोलिसांना फोन करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही मिनिटांतच पोलिसांसमोर तिचं पितळ उघडं पडलं. अखेर तिने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. सुनील कदम (वय-36) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी प्रणाली कदम (वय-33) हिला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, नालासोपारा पूर्वेकडील गालानगर परिसरातील ओम तुलसी अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी / 02मध्ये सुनील कदम, पत्नी प्रणाली, आई-वडील आणि दो मुलींसोबत राहत होता. सुनील आणि प्रणालीचे बुधवारी पहाटे पाच वाजता कडाक्याचे भांडण झाले होते. नंतर तो बेडरूममध्ये पुन्हा झोपायला गेला. प्रणाली पाणी पिण्याच्या बहाण्याने किचनमध्ये गेली. प्रणालीने हातात चाकू घेऊन ती बेडरूममध्ये परतली. सुनील झोपला असताना तिने तिच्या पोटावर 11 वार केले. नंतर त्याचा गळा कापून तिच्या निर्घृण हत्या केली. पतीची हत्या केल्यानंतर प्रणाली दुसऱ्या खोलीत गेली. तिथे सासू-सासरे आणि दोन मुली झोपल्या होत्या. तिने खोलीत जाताच बेशुद्ध झाल्याचे नाटक केले. सासू-सासरे झोपेतून जागे झाले. सुनीलने आत्महत्या केल्याचे त्यांना सांगितले. नंतर प्रणालीने पोलिसांना फोन करून पतीने आत्नहत्या केलाचा बनाव केला. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

एखादी व्यक्ती स्वत:च्या पोटावर 11 वार करू शकत नाही. तसेच स्वत: चा गळाही चिरून आत्महत्या करू शकत नाही, हे पोलिसांच्या तपासात समोर आले. प्रणालीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर ती पोपटासारखी बोलू लागली. पतीची हत्या केल्याचे तिने पोलिसांसमोर कबूल केले. पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हत्या केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

VIDEO: 'काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा झाल्यानं यात्रा रद्द झाली', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2019 12:16 PM IST

ताज्या बातम्या