शीना बोरा हत्याकांडाच्या तपास अधिकाऱ्यांच्या पत्नीची निर्घृण हत्या

शीना बोरा हत्याकांडाच्या तपास अधिकाऱ्यांच्या पत्नीची निर्घृण हत्या

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • Share this:

24 मे : शीना बोरा हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तसंच, त्यांचा मुलगाचं ही अपहरण झालं आहे. दरम्यान, हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबई इथल्या सांताक्रूझ पश्चिम भागात राहणारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे हे सकाळी सांताक्रूझच्या प्रभात कॉलनीतील आपल्या घरी परत आले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी पत्नीला फोन केला पण तो ही बंद लागला. मग त्यांनी दरवाजा उघडला. या वेळी त्यांना त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्या.

गणोरेंनी लगेचच 100 क्रमांकावरून पोलिसांना हत्येची माहिती दिली. यानंतर आपल्या पत्नीला तातडीने व्ही. एस. देसाई रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ज्ञानेश्वर गणोरे हे मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कार्यरत असून सध्या ते शीना बोरा हत्येचा तपास करतायेत. त्यांच्या तपासाच्या आधारवरच मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती.

तपास अधिकारी गेणोरेंची पत्नीची हत्या

- ज्ञानेश्वर गणोरे शीना बोरा हत्येचा तपास करीत होते

- गणोरे मुंबई खार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत

- शीना बोरा हत्या प्रकरण खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल

- 2012 साली शीना बोराची हत्या

- शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला अटक

- इंद्राणी मुखर्जी आणि तिचा नवरा पीटर मुखर्जी तरूंगात

- 24 मे 2017 ज्ञानेश्वर गणोरेच्या पत्नीची संशयास्पद हत्या

- गणोरेंच्या मुलाचं अपहरण

First published: May 24, 2017, 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading