पती घेत होता चारित्र्यावर संशय, पत्नीने मुलाच्या मदतीने काढला असा 'काटा'

पती घेत होता चारित्र्यावर संशय, पत्नीने मुलाच्या मदतीने काढला असा 'काटा'

दारूसाठी घरातील दागिने व पैसे घेऊन जायचा, पत्नी शोभा व मुलगी पूजा या दोघांच्या चारित्र्याच्या संशय घेऊन अश्लील शिविगाळ करत होता.

  • Share this:

विजय देसाई,(प्रतिनिधी)

वसई,5 डिसेंबर: सततची मारहाण आणि चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेने यात तिच्या मुलाची मदत घेतल्याची माहिती पोलिस चौकशीत उघड झाली आहे. वालीव येथे ही घटना घडली आहे.

वसई पूर्वेकडील वालीव गावातील मराठी शाळेमागे असलेल्या रमेश माळवी बिल्डिंगच्या सदनिका नंबर 104 मध्ये राहणारा अंकुश धोंडू चव्हाण (45) यांचा शनिवारी रात्री साडे दहा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान अति दारू सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याची तक्रार मुलगा कृष्णा चव्हाण (19 ) दिली होती. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला होता.

मयत अंकुश चव्हाण हा नेहमी दारू पिऊन पत्नी शोभा चव्हाण व तिच्या मुलांना मारहाण करत होता. दारूसाठी घरातील दागिने व पैसे घेऊन जायचा, पत्नी शोभा व मुलगी पूजा या दोघांच्या चारित्र्याच्या संशय घेऊन अश्लील शिविगाळ करत होता. शोभाच्या कामावर जाऊन त्याठिकाणी तिची बदनामी करत होता. सगळ्यांसमोर मारहाण करत होता. हे नित्याचेच झाले होते. दारू प्यायल्यानंतर घरी सुद्धा मोठमोठ्याने भांडण करायचा. त्यामुळे शेजारीचे लोकही त्याला कंटाळले होते. सततच्या त्रासाने तिला घर मालकाने घर खाली करायला सांगितले होते. पतीच्या अशा वागण्याने कोणीही घर भाड्याने देत नव्हते. घटनेच्या दिवशी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन आलेल्या अंकुशने पत्नी शोभा, मुलगी पूजा आणि अल्पवयीन मुलगा यांना शिविगाळ करून त्यांच्या चारित्र्याच्या संशय घेऊन अश्लील शिविगाळ केली. पती शोभाला त्याचा राग आला. अंकुश घरात खाटेवर झोपला असताना शोभाने मुलाच्या मदतीने त्याचा ओढणीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह घराबाहेर वरांड्यांत ठेवून दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची खोटी तक्रार पोलिसांत दिली. मात्र, पोलिस चौकशीत शोभानेच पतीची हत्या केल्याचे समोर आले. वालीव पोलिसांनी पत्नी शोभा चव्हाण आणि अल्पवयीन मुलगा कृष्णा चव्हाण याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत पराड करत

Published by: Sandip Parolekar
First published: December 5, 2019, 7:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading