Home /News /mumbai /

15 वर्षे वनवास भोगला पण शेवटी हरलीच; पतीच्या छळाला कंटाळून उचललं भयावह पाऊल

15 वर्षे वनवास भोगला पण शेवटी हरलीच; पतीच्या छळाला कंटाळून उचललं भयावह पाऊल

Suicide in Mumbai: मुंबईतील गोरेगाव परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या पत्नीचा अमानुष छळ केला आहे.

    मुंबई, 10 जानेवारी: मुंबईतील (Mumbai) गोरेगाव परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या पत्नीचा अमानुष छळ (Inhuman persecution) केला आहे. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं गळफास (Wife commits suicide) घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. अजित प्रताप सिंग असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी अजित हा गेल्या काही काळापासून आपल्या पत्नीला सतत मारझोड करत होता. अगदी क्षुल्लक कारणातून देखील आरोपी पीडितेवर अमानुष अत्याचार करायचा. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं आत्महत्या केली असल्याचा आरोप, मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. हेही वाचा-मुख्याध्यापकाचं महिलेसोबत विकृत कृत्य; काम असल्याचं सांगत शाळेत बोलावलं अन्... फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मृत महिलेचा 10 जानेवारी 2007 साली आरोपी पती अजित प्रताप सिंग याच्यासोबत झाला होता. आरोपी अजित हा फिर्यादीच्या मित्राचा मुलगा आहे. मैत्रीच्या नात्यातून हे लग्न जुळलं होतं. पण लग्नानंतर काही वर्षात आरोपी अजित सिंग याने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. त्याचे अन्य एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. यातून पती-पत्नीत नेहमी वाद होऊ लागला होता. यामुळे आरोपी पीडितेला दमदाटी करत बेदम मारहाण करायचा. हेही वाचा-अंथरुणाला खिळलेल्या तरुणाला बापाने दिला भयंकर मृत्यू; जीव जाईपर्यंत घातले घाव पतीचे बाहेर सुरू असलेले अनैतिक संबंध आणि सततची होणारी मारहाण यामुळे पीडित महिला चिंताग्रस्त झाली होती. यातूनच त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 3 जानेवारी रोजी मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा फोन पीडितेच्या वडिलांना आला होता. मुलीची प्रकृती खराब असल्याचं समजात वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. पण याठिकाणी आल्यानंतर त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं त्यांना समजलं. याबाबत फिर्यादीनं जावयाकडे चौकशी केली असता मुलीने गळफास घेतल्याचं त्यानं सांगितलं, अशी माहिती मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Suicide

    पुढील बातम्या