पत्नीने घातला पोलीस स्टेशनमध्ये राडा, पतीला तर मारलंच महिला कॉन्स्टेबलच्या पोटातही मारली लाथ

पत्नीने घातला पोलीस स्टेशनमध्ये राडा, पतीला तर मारलंच महिला कॉन्स्टेबलच्या पोटातही मारली लाथ

वसईमध्ये एका पत्नीने पोलीस स्टेशनमध्येच आपल्या पतीला मारहाण केली. एवढंच नाहीतर या महिलेनं पोलिसांवरही हात उचलला.

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

वसई, 18 डिसेंबर : नवरा बायकोमध्ये रूसवे फुगवे हे आलेच. पण, वाद जर विकोपाला गेला तर याचे रुपांतर हाणामारीत होते. वसईमध्ये एका पत्नीने पोलीस स्टेशनमध्येच आपल्या पतीला मारहाण केली. एवढंच नाहीतर या महिलेनं पोलिसांवरही हात उचलला.

वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात कौटुंबिक वादातून पतीची तक्रार करण्यासाठी परिमिता देशमुख-ढोले यांनी चक्क पतीलाच मारहाण केली. पोलिसांना ही मारहाण करून पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला असून याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वसई पश्चिमेकडील अंबाडी रोड येथील राजेश पार्कमध्ये शौमिक देशमुख ढोले आणि त्यांची पत्नी परिमिता हे कुटुंबासह राहतात. सोमवारी शौमिक यांना त्यांच्या काकांकडे जायचं नाही, असं परिमिता यांनी सांगितलं.

त्यावर शौमिक यांनी, "तू तुझ्या आई-वडिलांकडे जातेस ना मग मी माझ्या नातेवाईकांकडे का जावू नये, मी जाणारच" असं  सांगितल्यावर त्या दोघांत हाणामारी झाली.

मारहाण झाल्यानंतर परिमिता यांनी आपल्या पतीच्या विरोधात १६ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर परिमिताचा पती शौमिक याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि एक दिवस पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवण्यात आलं होतं.

पती पोलीस स्टेशनमध्ये असताना परिमिता पुन्हा तिथे पोहोचल्या आणि पोलिसांसमोर पतीला शिवीगाळ करून मारहाण करू लागल्या. यावेळी दोघांना सोडवायला गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी डोके यांच्या पोटावर लाथ मारून पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेली.

हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही. या महिलेने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत खुर्च्या आपटून गोंधळ घातला. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपाससहाय्यक पोलीस निरीक्षक गोवर्धन गिरवले हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 11:17 PM IST

ताज्या बातम्या