Home /News /mumbai /

'..तर चंद्रकांत पाटीलही पर्याय होते, फडणवीसांवरच अन्याय का?' प्रकाश आंबेडकरांचा थेट केंद्राला सवाल

'..तर चंद्रकांत पाटीलही पर्याय होते, फडणवीसांवरच अन्याय का?' प्रकाश आंबेडकरांचा थेट केंद्राला सवाल

शरद पवार, अमोल मिटकरी, नाना पटोले यांच्यानंतर आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar Tweet) यांनीही फडवणीसांवर अन्याय झाल्याचं म्हणत त्यांना डिवचलं आहे.

    मुंबई 01 जुलै : राज्याच्या राजकारणात मागील 8 ते 10 दिवसांपासून हालचालींना वेग आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (Shivsena) 39 आणि 11 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह बंड केलं. या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गट मिळून सरकार स्थापन करण्यासाठी पुढे आले. मात्र यावेळी देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्रीपद सांभाळतील, असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र, ऐनवेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) असतील, अशी घोषणा केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला . यानंतर विरोधी पक्षांनी फडणवीस यांच्यावर हा अन्याय असल्याचं सांगत त्यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. शिंदे सरकारचं भवितव्य रविवारी होणार निश्चित, Floor Test पूर्वीच निर्णायक परीक्षा शरद पवार, अमोल मिटकरी, नाना पटोले यांच्यानंतर आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar Tweet) यांनीही फडवणीसांवर अन्याय झाल्याचं म्हणत त्यांना डिवचलं आहे. बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते मुख्यमंत्री झाले, असं ट्विट मी केलं आहे. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का? हे केंद्रात विचारायला हवं, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आमची सहानुभूती देवेंद्र फडणवीसांसोबत आहे अशा अर्थाचा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. 'पुजारी त्यांना केलं, कारण आपल्याला देव व्हायचंय'; तो व्हिडिओ शेअर करत मिटकरींचा फडणवीसांना टोला? नुपूर शर्मा प्रकरणावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आहे, असे सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना सुनावले. तुम्ही टीव्हीवर जाऊन माफी मागावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला माफी मागायला सांगितली, हा निर्णय शांतता अबाधित ठेवण्यासाठी योग्य असला तरी आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी मात्र हानिकारक आहे. कारण त्यातून देशाबाहेर वेगळा मेसेज जातो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Prakash ambedkar

    पुढील बातम्या