मुंबई, 02 जुलै : राजकीय सत्ता संघर्षानंतर अखेरीस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. पण, देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असताना उपमुख्यमंत्रिपद दिल्यामुळे भाजपच्या गोटात कमालीची नाराजी पसरली आहे. फडणवीस समर्थकांनी अमित शहा यांचा फोटो सुद्धा बॅनरवरून हटवला आहे. याच प्रश्नावर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आज कोणतेही उत्तर न देता पळ काढला.
एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटपाबाबत रस्सीखेच सुरू आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आज भाजपच्या नेत्यांच्या भेटीला पोहोचले यावेळी खोत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
संजय राऊत हे दुधात मिठाचा खडा आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर मात्र त्यांना कधी बोलावसं वाटलं नाही. राज्यातला शेतकरी आत्महत्या करत होता त्याच्यावर ते बोलले नाहीत आपण बोलून बोलून आपलं राज्य घडवलं आता थोडं शांत बसावं, असा सल्लावजा टोला खोत यांनी सेनेला लगावला.
('या' योजनेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स कोर्सचे अगदी मोफत प्रशिक्षण, पहा VIDEO)
'देवेंद्र फडणवीस हे लोकमान्य नेते आहेत आणि त्यांनी दाखवून दिलेला आहे की, त्याग कशाला म्हटला जातो आणि एक मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व या राज्याला मिळाला. आज महाराष्ट्रातली जनता मोठ्या मातीतला माणूस आहे आणि गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी जे निर्णय घेतला त्याचं कौतुक सगळ राज्य करत आहे आणि लढणारी माणसं हे नाराज नसतात, तेवढ्याच ताकदीने क्षमतेने परत कामाला लागत असतात कार्यक्रम त्यांना लढाईसाठी उभा करत असतात म्हणून मला वाटतं नाराजी संजय जास्त प्रेम आहे, असंही खोत म्हणाले.
(पोलीस होण्याचं स्वप्न अर्धवट राहिले, सरावादरम्यान दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले)
यावेळी पत्रकारांनी भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो बॅनरवरून काढण्यात आला, असं विचारले असता, सदाभाऊ खोत यांनी कोणतेही उत्तर न देता पळ काढला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.