मुंबई, 09 मे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. तुमचा जामीन का रद्द करू नये, असा सवाल करत मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस जारी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणे प्रकरणी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. तसंच प्रसारमाध्यमांशी बोलण्याची मनाई केली होती. पण, लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) बाहेर पडताच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.
त्यामुळे राणा दाम्पत्याच्या विरोधात सरकारी वकिलांनी तक्रार केली होती. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. कोर्टाचा अवमान केल्याची ही तक्रार केली होती. राणा यांनी कोर्टाचा अवमान केल्याचा सरकारी वकिलांचा दावा केला होता. प्रसार माध्यमांशी बोलू नये अशी अट घातली असतानाही राणा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. यावर कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
('यायलाच पाहिजे..!', मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेचा जबरदस्त टीझर; क्षणात Video Viral)
'तुमचा जामीन का रद्द करू नये, असा सवाल सत्र न्यायालयाने उपस्थितीत केला आहे. तसंच, राणा दाम्पत्यांना नोटीस जारी केली आहे. या नोटीसानुसार १८ मेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मूभा दिली आहे.
दरम्यान, दुसरीकडे नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही दिल्लीत पोहोचले आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलेचा अपमान केलेला आहे. सोबतच आम्ही कुठल्याही प्रकारचं नाटक करत नाही उद्धव ठाकरे यांच्या दबावापोटी आमच्यावर जी कारवाई झाली आहे त्याची तक्रार करण्या करता आम्ही दिल्लीत आलो आहे, अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली.
(राणादा- पाठक बाईंनी गुपचूप उरकलं लग्न ? अक्षयाचा मंगळसूत्र घातलेला Video Viral)
तर, मी कोर्टाची अवहेलना केली नाही. कोर्टाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन केले आहे. आज मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहे. सोबतच गृह सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहे,अशी माहिती खा.नवनीत राणा यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Navneet Rana, Ravi rana, Uddhav thackeray