Home /News /mumbai /

संभाजी महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रात का रखडला? संजय राऊतांचा भाजपला थेट सवाल

संभाजी महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रात का रखडला? संजय राऊतांचा भाजपला थेट सवाल

' 'इतर पक्षांनी नामकरणाबद्दल चिंता करू नये, त्यांनी ते आमच्यावर सोडून द्यावे, त्यांनी फार राजकारण यात करू नये'

    मुंबई, 04 जानेवारी : औरंगाबाद शहराच्या (Aurangabad) नामकरणाच्या मुद्यावरून राजकीय वाद पेटला आहे. भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराज यांच्या नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे तो का रखडला आहे? असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला विचारला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. तसंच औरंगाबाद  शहराच्या नामाकरणाच्या मुद्यावरून रोखठोक भूमिका मांडली. 'औरंगाबाद शहराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे आशिष शेलार, काँग्रेस आणिअबू आझमी सर्वांना माहिती आहे.  औरंगाबाद शहराचे नामकरण 30 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्यावर सरकारकडून सही, शिक्का उमटायला पाहिजे होते. हे काम भाजप सरकारच्या कार्यकाळ होणे गरजेचं आहे. पण, ते अजूनही झाले नाही' असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. 'इतर पक्षांनी नामकरणाबद्दल चिंता करू नये, त्यांनी ते आमच्यावर सोडून द्यावे, त्यांनी फार राजकारण यात करू नये. नामकरणाचा मुद्दा त्यांना इतका महत्त्वाचा वाटत असेल तर त्यांनी हा प्रश्न शिवसेनेला विचारण्यापेक्षा जे विरोध करत आहे, त्यांना विचारला पाहिजे की, तुम्ही याला विरोध का करत आहात.  पण ते प्रश्न विचारत आहे शिवसेनाला हे उलट होत आहे' असंही राऊत म्हणाले. 'औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव हे संभाजी महाराज करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने केला होता. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. पण त्यावर कोणताही निर्णय अद्याप झाला नाही. भाजपच्या नेत्यांनी आता दिल्लीत जावे आणि हा प्रस्ताव का रखडला याची विचारणा करावी आणि राज्याला उत्तर द्यावे' अशी मागणीच राऊत यांनी भाजपकडे केली आहे. 'अबू आझमी यांनी राम मंदिराच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते औरंगाबादच्या नामाकरणाला विरोध करतील असं वाटत नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो आम्ही चर्चा करून प्रश्न सोडवू' असंही ही राऊत म्हणाले. ' संभाजी नगर नामांतर ला विरोध का करत आहेत असा सवाल भाजप ने विचारायला हवा, पण ते शिवसेनेला विचारतात, म्हणजे ते औरंगाबादच्या बाजूने आहेत का? मुळात एमआयएम आणि भाजपची जुनी मैत्री आहे. त्यांनी त्यांची समजूत काढावी की नामांतराला विरोध करू नका', असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, MIM, Shivsena, भाजप, शिवसेना

    पुढील बातम्या