Home /News /mumbai /

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं करण्यासाठी महाविकास आघाडी का? प्रताप सरनाईकांचा पत्रातून गंभीर सवाल

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं करण्यासाठी महाविकास आघाडी का? प्रताप सरनाईकांचा पत्रातून गंभीर सवाल

'गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. मात्र,

    मुंबई, 20 जून : महाविकास आघाडी सरकारमध्ये एकीकडे स्वबळाची घोषणाबाजी सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery) यांच्या स्फोटक पत्र लिहिल्यामुळे खळबळ उडाली आहे 'भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली का?' असा सवालच या पत्रातून उपस्थितीत करण्यात आला आहे. अवैध मालमत्ता प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेत खळबळ उडाली आहे. 'गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. मात्र, आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत. अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एक विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली का? असा सवाल सरनाईक यांनी उपस्थितीत केला. नवऱ्यासाठी नाही या गोष्टीसाठी तरुणीनं केलं लग्न?मंडपातील प्रकार पाहून वराती थक्क तसंच, 'आपण आपल्या पदाला न्याय दिला आहे व देत आहा. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरू आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे' असंही सरनाईक म्हणाले. 'भाजपशी जुळवून घ्या' तसंच, 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.' असंही सरनाईक म्हणाले आहे. स्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा सतत आघात होत आहे, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंजवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही सरनाईक यांनी मांडली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: ठाणे, प्रताप सरनाईक, शिवसेना

    पुढील बातम्या