मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /लॉकडाउन लावायचा का? मुख्यमंत्री ठाकरे Vs देवेंद्र फडणवीस LIVE

लॉकडाउन लावायचा का? मुख्यमंत्री ठाकरे Vs देवेंद्र फडणवीस LIVE

'मी पंतप्रधानांशीही बोललो आहे. कोरोनाची साखळी तोडणे, आरोग्य सुविधा वाढवणे, गरजेचं आहे. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे'

'मी पंतप्रधानांशीही बोललो आहे. कोरोनाची साखळी तोडणे, आरोग्य सुविधा वाढवणे, गरजेचं आहे. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे'

'मी पंतप्रधानांशीही बोललो आहे. कोरोनाची साखळी तोडणे, आरोग्य सुविधा वाढवणे, गरजेचं आहे. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे'

मुंबई, 10 एप्रिल : राज्यात कोरोनाची (Corona) परिस्थिती बिकट होत असल्यामुळे लॉकडाऊन (Lockdown) लावण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिनाभर लॉकडाऊन लावण्याबाबत संकेत दिले आहे. तर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी आपली भूमिका मांडली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  लॉकडाऊन हा एकमात्र मार्ग नाही मात्र तो जगाने स्विकारलेला आहे. आपण आरोग्य सुविधा वाढवलेल्या आहेत. लॉकडाऊनची वेळ आलेली आहे.'

व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतल्या नंतरही काही व्यक्तींना कोविड 19 ची लागण होतेय या संदर्भात मी पंतप्रधानांशीही बोललो आहे. कोरोनाची साखळी तोडणे, आरोग्य सुविधा वाढवणे, गरजेचं आहे. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. मधला काळ बरा होता. सर्व व्यव्हार सुरू झाले होते. पण पुन्ह एकदा संसर्ग सुरू झाला, आता तर तरुण वर्ग यात आढळतोय. आता सर्वांना लस देण्याची मागणी आपण करतोय ही साखळी तोडनं आता गरजेचं झाले आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

द कपिल शर्मा शोनं या कलाकारांना केलं कोट्यधीश; दिवसाला मिळतात इतके लाख रुपये

तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'कोविड 19  चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील मिळतील याची व्यवस्था करणं आवश्यक आहे.. रेमडेसीविर संदर्भात खासगी हाॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही आहे. फक्तं सरकारी हॉस्पिटलमध्ये उपलब्धता नको खासगी हॉस्पिटलमध्येही हवेत. रेमडेसीवीर तात्काळ कसे उपलब्ध कसे देता येईल, याचा विचार केला पाहिजे'

चाचणी झाल्याव रुग्णं वाढ आपल्याला कळते. आपल्याला आता रुग्णं वाढ रोखायची आहे. वर्क फ्राँम होमची पुन्हा सुरवात करा. आपल्याला आता एकमुखी निर्णय घ्यावा लागेल. 'महिनाभराच्या आत आपण या परीस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो. त्यासाठी आपण एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

नवे बेड निर्माण करावे लागतील. हे आता किती दिवस चालेल या बद्दल सांगता येत नाही. आपल्याला अधिकची व्यवस्था निर्माण करावी लागेल, जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल. काही जण तर आम्ही मेलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्यात असं म्हणणारे आहेत. त्यासाठी आपण अशा लोकांचाही विचार करावा. सर्व कर आणि कर्ज फेडावं लागत आहे अशा परिस्थितीत कसं घर चालवायचं असा प्रश्नं आहे. काय काय चालवता येईल याचा विचार करून निर्णय घ्यावा. ज्यांचं काम सुरू करता येणार नाही, त्यांच्यासाठीही काय करता येईल हे देखील पहावं. लहान उद्योजक आणि हातावर पोट असणाऱ्याचा देखील विचार करावा. आताची परीस्थितीत आर्थिक बोजा वाढला तरी अशा लोकांसाठी काहीतरी आर्थिक मदत करण्यासाठी विचार करावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी दिली.

IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेलवरून RCB आणि पंजाब किंग्स सोशल मीडियावर भिडले

'वीज बील संदर्भातही विचार करावा वीज कनेक्शन कट करत आहेत. त्याचाही विचार करावा. केश कर्तनालय यांच्या समोर असा प्रश्नं आहे की काय खायचं त्यांचाही विचार करावा. त्यांच्यासाठी काय सूट देता येईल का, आपण सर्वांची नुकसान भरपाई करता येणार नाही पण जगता येईल याचा विचार करावा. लोकांचा उद्रेक टाळण्यासाठी नियोजन करावं लागेल. परिस्थिती समजून निर्णय घ्यावा, असं आवाहनही फडणवीस यांनी केले.

'अशा परीस्थितीत कोणतंही राजकारण होता कामा नये. पण हा नियम सत्ताधारी पक्षानेही लागू करावेत. त्यांनी काही म्हटलं की आम्हालाही उत्तर द्यावं लागतं. आमच्याकडे जे बोलणारे असतील त्यांनाही मी समज देतो आपण ही आपल्या बाजूने समज द्यावी' असंही फडणवीस म्हणाले.

First published:

Tags: Lockdown