मुंबई 19 एप्रिल: देशात महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दररोज यात वाढच होत आहे. तर मृत्यूची संख्याही वाढते आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, ही शहरं हॉटस्पॉट ठरली आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण सापडत असल्यामुळे चिंता वाढत असली तरी ती भविष्याच्या दृष्टीने तेच योग्य असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करणं गरजेचं असतं. कारण अनेक कोरोनाबाधित रुग्णांना या रोगाची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे असे रुग्ण समोर न आल्यास त्यांच्यामुळे इतरांना बाधा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने कोरोनाच्या चाचण्या (corona testing) वाढवल्या असून आता कोरोना टेस्टिंगमध्ये महाराष्ट्र राज्यच सर्वात आघाडीवर आहे. आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) जाहीर केलेल्या आकडेवारीतून हा खुलासा झाला आहे.
आजपर्यंत (19 एप्रिल) 72 हजार तेवीस टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातले 66 हजार 673 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्या तुलनेत इतर राज्ये कुठेच नाहीत. चाचण्या घेण्यात आपल्यापाठोपाठ राजस्थान, गुजरात तामिळनाडू आणि पाचवा क्रमांक उत्तर प्रदेशचा लागतो. रँपिड टेस्टिंगचं घोषणा करणारं केजरीवालांचं दिल्ली तर थेट सातव्या क्रमांकावर आहे. तर सहावा क्रमांक केरळचा लागतो.
ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट अशा तीन ‘टी’ चा फॉर्म्युला जागतिक पातळीवर सांगितला जातो. जेवढ्या लवकर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होतील तेवढ्या लवकर त्याचा प्रसार रोखता येणार आहे.
कोरोना टेस्टिंग आकडेवारी (18 एप्रिलपर्यंत)
राजस्थान -42718
गुजरात -30783
तामिळनाडू - 29178
उत्तर प्रदेश - 26829
केरळ - 22, 000
दिल्ली - 20, 000
हे वाचा -
'उन्हात नष्ट होतो कोरोना', प्रयोग अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेचा दावा
कोरोनाची संशयित पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं म्हणून पत्नीनं घरीच केले उपचार