मुंबई, 03 डिसेंबर : मास्क (Mask) का नाही घातला म्हणून विचारले म्हणून एका महिलेनं पालिका कर्मचाऱ्यांवर भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आरोपी महिलेनं पालिकेच्या कर्मचारी दर्शना चौहाण यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला आहे. जखमी महिला कर्मचाऱ्यावर मुंलुंडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ मोतीबाईवाडी परिसरात 2 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या महिला रोहिणी सुरेश दोंदे, शोभा दोंदे आणि सीमा भेंडाळे या संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास विना मास्क रस्त्यावर फिरत होत्या. तसंच रस्त्यावर थुंकत असल्याचे त्यावेळी या परिसरात कर्तव्यावर असलेल्या पालिकेच्या कर्मचारी दर्शना चौहाण यांना निदर्शनास आले.
धुळे विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपने मारली बाजी, महाविकास आघाडीचा पहिला पराभव
दर्शना यांनी आरोपी रोहिणी दोंदे यांना मास्क का घातले नाही अशी विचारणा केली. मास्क न घालण्याच्या कारणावरून दोघींमध्ये बाचाबाची झाली. काही वेळाने बाचाबाचीचे रुपांतर हाणामारी झाले. यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या तिन्ही महिलांनी मिळून दर्शना यांना लाथा बुक्याने मारहाण केली. तसंच रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत दर्शना या जमिनीवर कोसळल्या.
एका सिमकार्डसाठी तोडलं सात जन्माचं नातं, 23 वर्षीय तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल
दर्शना यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सहकारी शीतल लांगळे यांनी दर्शना चौहाण यांना मुलुंड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर दर्शना चौहाण यांच्या फिर्यादीवरून मुलुंड पोलीस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहिंणी दोंदे, शोभा दोंदे आणि सीमा भेंडाळे या तिंघीविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.