मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

प्रताप सरनाईकांचं पत्र नेमकं कशामुळे? सेनेच्या गोटात चाललंय काय?

प्रताप सरनाईकांचं पत्र नेमकं कशामुळे? सेनेच्या गोटात चाललंय काय?

मी अडचणीत आलोय हे माझे वाक्य आपसूक नव्हते, मला त्रास झाल्याने मी अडचणीत आलो, असं म्हटलो होतो.

मी अडचणीत आलोय हे माझे वाक्य आपसूक नव्हते, मला त्रास झाल्याने मी अडचणीत आलो, असं म्हटलो होतो.

'आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 20 जून : मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaiks letter ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery)यांना पत्र लिहून 'भाजपशी हात जुळवून घ्यावे, भविष्यात तेच चांगले राहिल' अशी विनंती केल्यामुळे सेनेत खळबळ उडाली आहे. पण या पत्रामुळे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थितीत झाले आहे.

मुळात प्रताप सरनाईक यांनी हे पत्र 9 जून रोजी लिहिलं होतं. त्यानंतर आज 10 दिवसांनी माध्यमांसमोर आले आहे. म्हणजे, शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाल्यानंतर हे पत्र समोर आले आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या काही महिन्यांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सरनाईक शक्यतो माध्यमांसमोर येत नाही. गेल्या 3 महिन्यांपासून ते गायब होते आणि आज या पत्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे.

यात पत्रात त्यांनी स्पष्टपणे युती करावी, अशी विनंतीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 'आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच' अशी विनंतीच सरनाईक यांनी केली.

मुंबई लोकलबाबत महापौर किशोरी पेडणेकरांचं महत्त्वाचं विधान

तसंच, सरनाईक यांची गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या चौकशीबद्दल त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत भाजपवर आरोपही केला आहे. "कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा सतत आघात होत आहे, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंजवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल' असा अनुभवच पहिल्यांदाच जाहीरपणे सरनाईक यांनी मांडला.

फक्त आपणच नाहीतर सेनेचे इतर तीन नेते सुद्धा अडचणीत असल्याचं सांगत 'प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे' असंही त्यांनी सांगितलं.

''आदित्य दादा'', पुण्यातल्या चिमुकल्या गडप्रेमीचं आदित्य ठाकरेंना पत्र

त्याचबरोबर सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही आरोप केले आहे. 'गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. मात्र, आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत. अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एक विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली का? असा सवाल सरनाईक यांनी उपस्थितीत केला.

आगामी मुंबई महापालिका निवडणुका पाहता सरनाईक यांनी 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.' असंही सरनाईक म्हणाले.

पेट्रोलपंपावरील वाद आमदार वैभव नाईक यांच्या अंगाशी

सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. विनाकारण कोण त्रास देत आहे, हे शोधून काढावे लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तर उद्धवजी यांनी विचार केला तर आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. एकीकडे वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले नेते आणि दुसरीकडे महाविकास आघाडी अशा दोन टोकांच्या मधोमधे उभे असलेल्या उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published:

Tags: Sanjay raut