Home /News /mumbai /

1 बोगी 72 प्रवासी; तरीही महिलेवरील Gang Rape रोखू शकले नाही; प्रत्यक्षदर्शी म्हणाला...

1 बोगी 72 प्रवासी; तरीही महिलेवरील Gang Rape रोखू शकले नाही; प्रत्यक्षदर्शी म्हणाला...

ट्रेनची एक बोगी, जिथं सर्वसाधारणपणे 72 सीट्स असतात. संपूर्ण बुकिंग असेल तर 72 प्रवासी असतील. मात्र तरीही महिलेवरील बलात्कार ते रोखू शकले नाही.

    मुंबई, 11 ऑक्टोबर : ट्रेनची एक बोगी, जिथं सर्वसाधारणपणे 72 सीट्स असतात. संपूर्ण बुकिंग असेल तर 72 प्रवासी असतील. मात्र आवश्यक नाही की 72 प्रवाशांमधील प्रत्येक साहसी असेल आणि आपल्या डोळ्यासमोर कोणी एका महिलेची छेड काढत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी उभा राहील. लखनऊ ते मुंबईचा प्रवास करणारी पुष्पक एक्सप्रेस (Pushpak Express) मध्ये शुक्रवारी 8 नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आणि प्रवाशांना लुटलं. ही घटना इगतपुरी आणि कल्याण स्टेशन (Kalyan Station) दरम्यान झाली. कसारा घाट (Kasara Ghat) पार करणाऱ्या ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 28 मिनिटांचा वेळ लागतो. 25 वर्षीय गुलफाम अली या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. आणि त्यांनी एका आरोपीला पकडलं आहे. गुलफाम अली (Gulfam Ali) यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, ते 8 जणं होतं. आणि ट्रेनमध्ये शिरताच प्रवाशांवर आक्रमकपणे व्यवहार करू लागले. लखनऊमध्ये राहणारे अली मुंबईत जाक होते. ते त्याच बोगीत होते. ज्यात नराधमांनी महिलेवर बलात्कार केला होता. (Why didn't anyone stop the men who gang raped a woman in train Eyewitness said because) अलीने सांगितलं की, असं दिसत होतं की, त्यांनी एकतर ते दारू प्यायले आहेत किंवा ड्रग्स घेतले आहे. ट्रेनमध्ये चढताच ते आक्रमक व्यवहार करू लागले. पहिल्यांदा त्यांनी बोगीमधील प्रवाशांसोबत धक्काबुक्की केली आणि ट्रेन स्टेशनवरुन निघताच ते हिंसक झाले. त्यांनी सांगितलं की, गुन्हेगारांकडे हातात घालायचं नक्कल डस्टर (knuckle duster) होता आणि ते त्यांनी अनेक प्रवाशांच्या डोक्यावर मारलं होतं आणि त्यांच्याकडून पैसेही घेतले होते. अलीने पुढे सांगितलं की, ‘नकल डस्टरशिवाय त्यांच्या जवळ सुरादेखील होता. ज्याच्या साहाय्याने ते लोकांना घाबरवत होते. आणि पैसे मागत होते. त्यांनी काही प्रवाशांवर हल्ला केली. जेव्हा मी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझ्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. माझ्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. मी घाबरलो आणि गप्प बसलो. व्यवसायाने कुक असलेला अली लॉकडाऊन संपल्यानंतर लखनऊवरुन मुंबईला परतत होता. ट्रेनमध्ये महिलेवर केला सामूहिक बलात्कार.. अलीने सांगितलं की, ट्रेन कसारा घाट स्टेशनवर पोहोचली, तर त्या 8 गुन्हेगारांनी एका महिलेसोबत गैरव्यवहार सुरू केला. कसारा घाटात ट्रेन निघण्यासाठी अनेक ठिकाणी टनल आहेत. त्यांनी सांगितलं की, गुन्हेगारांनी अनेक प्रवाशांना लुटलं. यावेळी ते सर्वांधिक हिंसक असल्याचं दिसत होते. यावेळी त्यांची नजर एका महिलेवर गेली. ती आपल्या पतीसह बसली होती. गुन्हेगारांनी तिच्यासोबत गैरव्यवहार केला. यावेळी महिलेचा पती त्यांच्यासोबत वाद घालू लागला. मीदेखील त्यांच्या वागणुकीचा विरोध केला. मात्र त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यांनी एका प्रवाशाला ट्रेनच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र ट्रेनची गती कमी असल्याकारणाने तो वाचला. हे ही वाचा-दुकानदाराच्या पत्नीकडून केली शरीरसुखाची मागणी;80 वर्षीय नाईकांची अशी झाली अवस्था सर्वजण फक्त बघत राहिले.. अलीने सांगितलं की, त्या नराधमांनी महिलावर लैंगिक अत्याचार केला. आम्हाला खूप असहाय्य वाटत होतं. ट्रेनमधील कोणीही व्यक्ती त्या भयावह घटना रोखण्याची हिम्मत करू शकला नाही. अलीने सांगितलं की, जेव्हा ट्रेन कसारा स्टेशनवर पोहोचली तेव्हा त्यांनी महिलेवरील अत्याचार थांबवला. स्टेशन जवळ आल्याचं पाहून काही प्रवासी आरडाओरडा करू लागले. दोन नराधमांना पकडलं... स्टेशन जवळ आल्यानंतर आम्ही सर्व आरडाओरडा करू लागलो. मात्र 6 नराधम ट्रेनच्या बाहेर उडी मारून फरार झाले. त्यावेळी एक गुन्हेगार पळण्याचा प्रयत्न करीत होता, त्यावेळी मी धाडस करून त्याला पकडलं. त्यानंतर काही लोक देखील मदतीला आले. आम्ही त्याला टॉयलेटमध्ये बंद केलं. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून पोलीस बोगीमध्ये चढले आणि दुसऱ्या एका गुन्हेगारालादेखील पकडलं. त्यानंतर आम्ही पकडलेल्या गुन्हेगाराला पोलिसांच्या हवाली केलं. या घटनेमुळे मला खूप धक्का बसला आहे. मनात खूप भीती बसली आहे. मात्र इतकी माणसं असतानाही त्या महिलेवरील अत्याचार थांबवू शकलो नाही याचं खूप जास्त वाईट वाटतंय.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gang Rape, Mumbai, Railway

    पुढील बातम्या