मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण का वाढलं? सरकारने दिलं स्पष्टीकरण

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण का वाढलं? सरकारने दिलं स्पष्टीकरण

तर मुंबईच्या 4 विभागांमध्ये या दराने 300 दिवसांचा टप्पा गाठला आहे.

तर मुंबईच्या 4 विभागांमध्ये या दराने 300 दिवसांचा टप्पा गाठला आहे.

महाराष्ट्राचा मृत्यूदर अनेक दिवसानंतर 4 च्या पुढे गेला आहे. देशात सध्या फक्त गुजरातचा मृत्यूदर पाचच्या पुढे आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई 16 जून: व आज करोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाली. तब्बल 1328 मृत्यूंची नव्याने नोंद झाली. त्यात गेल्या 24 तासांत नोंदल्या गेलेल्या 81 कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना मृत्यूंचा आकडा एकदम 1409 ने वाढला आहे. त्यामुळे राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. तर जन्म आणि मृत्यू नोंदविण्याचे जे निकष आहेत त्यानुसारच नोंदणी करण्यात येत असल्याचं राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितलं. या सगळ्या नोंदींची पडताळणी करूनच नवी संख्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात Coronavirus मुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा दडवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर आज आरोग्य विभागातर्फे आकड्यांची फेरपडताळणी करण्यात आली  त्यामुळे महाराष्ट्राचा मृत्यूदर अनेक दिवसानंतर 4 च्या पुढे गेला आहे. देशात सध्या फक्त गुजरातचा मृत्यूदर पाचच्या पुढे आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनेही यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यात म्हटलंय की, 19 रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते.  या माहितीत पारदर्शकता असावी आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही व्हावी अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रारंभीपासून दिली असून त्यानुसारच हे  समायोजन करण्यात आले आहे. शिवाय यामध्ये संपूर्ण पारदर्शकता राहावी म्हणून या माहितीचे समायोजन नियमितपणे केले जाणार आहे. यापूर्वी देखील दुबार नावे वगळण्याची  कार्यवाही झाली होती.  13 जून रोजीच सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्यांना यासंदर्भात त्यांच्या त्यांच्या अखत्यारीतील प्रयोगशाळांकडून अद्ययावत माहिती घेण्यास व ती भरण्यास सांगितले होते, त्यानुसार  फेरतपासणी करून समायोजन केलेली माहिती ही वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येत आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या