मुंबई, 10 ऑगस्ट : भाजपमधील काही आमदार आणि नेते हे राष्ट्रवादीमध्ये लवकरच दाखल होणार असे संकेत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिल्यानंतर भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र, 'हा मनात मांडे खाण्याचा प्रकार' असल्याचं म्हणत पलटवार केला आहे.
न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाही, असं ठामपणे सांगितले आहे. 'भाजप आमदार इतर पक्षाच्या संपर्कात असल्याचं सांगणे म्हणजे मनात मांडे खाण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीतील आमदार फुटू नये म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे' असं प्रत्युत्तर पाटील यांनी दिले.
भाजपला लवकरच मोठा झटका, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिले संकेत
तसंच, काही दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे अजित पवार यांना भेटले होते. तसंच कराडमध्येही शरद पवार यांनी बोलावलेल्या कोरोना आढावा बैठकीला हजर होते. शिवेंद्रराजेंच्या या भेटीमुळे साताऱ्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते.
या भेटीवर चंद्रकांत पाटलांनी सावध प्रतिक्रिया दिली. 'शिवेंद्रराजे हे शरद पवार यांना भेटले यात गैर काय आहे? शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याकडे कामासाठी कुणीही भेटू शकतो, मी ही भेट घेत असतो' असं पाटील म्हणाले.
तसंच, 'महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही सरकार वैगेरे अस्थिर करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही' असंही पाटील म्हणाले.
आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्वीट केले होते. 'गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अश्या बातम्या पेरल्या गेल्या आहे. पण, ही निव्वळ अफवा आहे. राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार भाजपच्या गळाला लागलेले नाही, अशी माहिती मलिक यांनी दिली.
मोठी बातमी, राष्ट्रवादीचे 12आमदार भाजपच्या गळाला? NCPच्या मोठ्या नेत्याचा खुलासा
तसंच, विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीतून अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले होते. आता हेच नेते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे. या नेत्यांना परत पक्षात घ्यायचे की नाही, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबद्दल निर्णय घेऊन घोषणा केली जाईल, असंही मलिक यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.