आयुष्यभर ब्रम्हचारी राहिलेल्या माधव पाटलांनी वयाच्या 66 वर्षी का थाटला संसार? अखेर त्यांनीच सांगितलं कारण...

आयुष्यभर ब्रम्हचारी राहिलेल्या माधव पाटलांनी वयाच्या 66 वर्षी का थाटला संसार? अखेर त्यांनीच सांगितलं कारण...

अखेर त्यांनीच सांगितलं वयाच्या 66 व्या वर्षी लग्नाचं कारण...

  • Share this:

नवी मुंबई, 7 नोव्हेंबर : सध्या सोशल मीडियावर माधव पाटील (Madhav Patil) यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. वयाच्या 66 व्या वर्षी लग्नाचा घाट घातल्याने सोशल मीडियावरुन त्यांची खिल्लीही उडवली जात आहे. मात्र गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कोरोनाच्या कहरामुळे (Coronavirus) माधव पाटील यांची आपला विचार बदलला आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं. लग्नानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या कुटुंबालाही मोठा आधार दिला आहे.

तरुणपणी साखरपुडा मोडल्यानंतर त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर त्यांचे नातेवाईक लग्नासाठी विनवणी करीत होते, मात्र तेव्हा त्यांनी हा विषय बाजूला सारला. अखेर वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी लग्न करण्याचा निर्धार केला. उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावात राहणारे माधव पाटील गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारितेत आहेत. त्यामुळे रायगडमध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. आता मात्र म्हातारपणात लग्न केल्यामुळे ते आणखीन चर्चेत आले आहेत.

हे ही वाचा-बापरे! Urvashi Rautela ने घातला 37 कोटींचा ड्रेस; PHOTO पाहून चाहते म्हणाले...

माधव पाटील यांनी अचानक का घेतला लग्नाचा निर्णय

कोरोनामुळे गेल्या 7 महिन्यांपासून माधव यांनी एकटेपणा जड झाला होता. त्यावेळी आपल्याला कोणीतरी सोबती असावी ही भावना त्यांना प्रकर्षाने जाणवू लागली. त्यांच्या आईचे वय 88 आणि ते 66 वर्षांचे. त्यामुळे घरात कोणीतरी सांभाळ करणारा असावा यातून त्यांनी संजना नावाच्या महिलेशी लग्न केलं. संजनाचं यापूर्वी लग्न झालेलं आहे. घटस्फोटीत असलेल्या संजनाचं वय 45 असून त्यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाल्याने आधार हरपला होता. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अशावेळी त्यांनी वयाने 20 वर्षे मोठ्या असलेल्या माधव यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला. सोशल मीडियावर सध्या माधव पाटील यांची टिंगल-टवाळी केली जात आहे. मात्र त्यांना त्याची पर्वा नाही. समाजासाठी 35-40 वर्ष खर्च करून पत्रकारिता, समाजकारण, राजकारण करून शेवटी पदरात टीकाच पडत असेल तर ती सहन करायला समर्थ असल्याचे माधव पाटील सांगतात.

Published by: Meenal Gangurde
First published: November 7, 2020, 9:08 PM IST

ताज्या बातम्या