मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलायचा का? सर्व मंत्र्यांनी हायकमांडला दिला निरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलायचा का? सर्व मंत्र्यांनी हायकमांडला दिला निरोप

ळासाहेब थोरात (Balasheb Thorat) हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा रंगली होती. पण 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका' असा सूर बहुतांश मंत्र्यांनी लगावला आहे.

ळासाहेब थोरात (Balasheb Thorat) हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा रंगली होती. पण 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका' असा सूर बहुतांश मंत्र्यांनी लगावला आहे.

ळासाहेब थोरात (Balasheb Thorat) हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा रंगली होती. पण 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका' असा सूर बहुतांश मंत्र्यांनी लगावला आहे.

मुंबई, 06 जानेवारी :नवी वर्षात काँग्रेसमध्ये (Congress) बदलाचे वार वाहण्यास सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा रंगली होती. पण 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका' असा सूर बहुतांश मंत्र्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र प्रभारी एचके पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे नेते, जिल्हाध्यक्ष, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधला. त्यात महाराष्ट्र काँग्रेस  प्रभारी यांच्यासमोर  काही मंत्र्यांनी भूमिका मांडली.

मुंबई सह्याद्री गेस्ट हाऊस येथे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली.  यावेळी 'राज्यात घडी बसली आहे, सरकार स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील समोर आहेतअशा वेळी बाळासाहेब थोरात यांना आता बदलण्याचे औचित्य, कारण दिसत नाही, तरी ही दिल्ली हायकमांड यांनी अंतिम निर्णय घ्यावा अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी  पाटील यांच्या समोर मांडली आहे.

Gold Price: घसरण होऊनही सोन्याचे दर 51 हजारांपेक्षा जास्त, चांदी 70 हजारांपार

दोन दिवस एच के पाटील हे मुंबईत येऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी कोण असावे याची चाचपणी करत आहेत.सकाळपासून त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर  वैयक्तिक संवाद साधला. काही मंत्री महाविकास आघाडी कार्यपद्धत यावर नाराजीही व्यक्त केली आहे. राज्यमंत्री यांना कॅबिनेट मंत्री अधिकार  दिले नाही यावरून पाटील समोर नाराजी व्यक्त केली.

राज्यात महाविकासआघाडी तिघांचे सरकार असताना देखील काँग्रेसला त्या तुलनेने सावत्र वागणूक मिळत आहे. विकास निधी आणि इतर महत्त्वाच्या मंत्रिपद यात वारंवार डावलले गेले आहे. यापुढील काळात काँग्रेसने स्वतःचं अस्तित्व ठेवत एक दबाव इतर दोन पक्षांवर ठेवावा, असा सूर देखील काही मंत्र्यांनी प्रभारी पाटील यांच्यासमोर मांडल्याचे समजते.

अभिज्ञा भावे मेहूल पैसोबत अडकली विवाहबंधनात; लग्नाचा VIDEO पाहिलात का?

आगामी पाच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा पाटील यांनी त्या स्थानिक जिल्ह्यातील नेत्यांची मतं जाणून घेतली. बहुतेक ठिकाणी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवावी अशा स्वरूपाची भूमिका स्थानिक नेत्यांनी मांडल्याचे समजते. महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमोर काँग्रेस पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी पक्ष संघटनात्मक कामकाज करणे तसेच अल्पसंख्याक मागासवर्गीय ओबीसी समाजाला जवळीक साधण्यासाठी नवीन योजना आणाव्यात, अशा सूचना देखील काही राज्यमंत्री आणि आमदारांनी केल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे असलेल्या मंत्र्यांच्या विभागातून देखील विकास निधी पुढील काळात काँग्रेसच्या आमदारांना मिळावा यासाठी काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी दबावतंत्राचा वापर करावा, असे परखड मत सुद्धा काही आमदारांनी मांडल्याचे समजते.

पुढील काळात ओबीसी चेहरा? 

मुंबई अध्यक्ष भाई जगताप मराठा समाज आतून करण्यात आल्याने आता जर पुढील काळामध्ये प्रदेशाध्यक्ष नवीन करायचाच असेल तर ओबीसी चेहरा आणावा याबाबत मतप्रवाह आहे. आजच्या बैठकीमध्ये देखील असंच मत काही जणांनी व्यक्त केल्याचे समजते.

विदर्भातून विजय वडेट्टीवार, नाना पटोले, यशोमती ठाकूर  यांची नावे चर्चेत आहेत.

मोठी कारवाई; माजी उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या पदाची जबाबदारी सोडण्याची तयारी दर्शवली आणि त्यानंतर राज्यात महाराष्ट्र काँग्रेसला नवीन नेतृत्वासाठी  प्रक्रिया सुरू केली. थोरात यांच्यानंतर बिगर मराठा चेहरा द्यावा अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू झाली. त्यामुळे काँग्रेसमध्ये मराठवड्यातून राजीव सातव, विदर्भातील विजय वडेट्टीवार, नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

First published: