मुंबई, 25 डिसेंबर : देशभरात कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे (omicron) रुग्ण वाढत असल्यामुळे निर्बंध लावले जात आहे. शासकीय आणि खासगी कार्यक्रमांना सुद्धा नियम लागू झाले आहे. अशातच भाजपचे नेते मुंबईत अटल महोत्सव (atal mahotsav 2021) कसा काय साजरा करू शकतात, अशा भाजपच्या नेत्यांना जबाबदार नेते कसे काय म्हणायचे? असा सवाल करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (bhai jagatap) यांनी भाजपच्या कार्यक्रमावर हरकत घेतली आहे.
मुंबईमध्ये खासदार गोपाळ शेट्टी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त अटल महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमावर भाई जगताप यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
आज संपूर्ण जगात कोविडचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने थैमान घातलेले आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देत आहे. भारतात देखील मागील काही दिवसांत ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना सुद्धा भाजपचे नेते खासदार गोपाळ शेट्टी यांनी देशाची माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त मुंबईतील कांदिवली पूर्व येथे अटल महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. कोविड व ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने सार्वजनिक सभा व कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम करण्यास बंदी घातलेली आहे.
VIDEO - नवरदेवाचं तोंड पाहताच नवरीबाईची सटकली; लग्न राहिलं बाजूला आधी केली धुलाई
रुग्णवाढीच्या भीतीमुळे देशामध्ये पुन्हा पूर्वीप्रमाणे निर्बंध लावण्यावर विचार सुरू आहे. असे असताना सुद्धा भाजपचे नेते अशा प्रकारचे सहा दिवसीय जाहीर कार्यक्रम कसे काय करू शकतात? अशा भाजपच्या नेत्यांना जबाबदार नेते कसे काय म्हणायचे? अशा शब्दांत भाई जगताप यांनी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, भाजपचे तमाम नेते व भाजप नेतृत्वाचा समाचार घेतला व या अटल महोत्सवाला आपला विरोध दर्शविला.
पतंग उडवताना 10 वर्षांचा मुलगा इमारतीवरून खाली कोसळला, सळई घुसली पोटात आरपार!
'देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी हे आम्हाला सुद्धा वंदनीय आहे. देशासाठी त्यांनी केलेले कार्य कुणीही विसरू शकत नाही. त्यांच्या जन्मदिवसाचा उत्सव हा व्हायलाच हवा. पण सध्या ज्या परिस्थितीतून देश जात आहे. देशात कोविड व ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. देशावर कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. असे असताना अशा प्रकारचे महोत्सव घेणे कितपत योग्य आहे. भाजपचे नेते आपले सामाजिक भान व आपली सामाजिक जबाबदारी पूर्णपणे विसरून गेलेले आहेत का? मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष आणि एक जबाबदार नेता म्हणून याचा विरोध करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Mumbai, Mumbai News