Home /News /mumbai /

राज्यातील सत्तासंघर्षात आता 'आरपार'ची लढाई, विधानसभेत 'ठाकरे' सरस की शिंदे?

राज्यातील सत्तासंघर्षात आता 'आरपार'ची लढाई, विधानसभेत 'ठाकरे' सरस की शिंदे?

बंडखोर आमदारांशिवाय सध्याच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमताचा आकडा गाठणे अशक्य आहे. मात्र शिंदे गट भाजप सोबत जात सरकार स्थापन करु शकतो ही दाट शक्यता आहे.

मुंबई, 29 जून : मागील 8-10 दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाने काल रात्री राज्यपालांची भेट घेत महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता सर्वच पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. राज्याच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 145 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. ज्या पक्षाकडे आकडे जास्त तो पक्ष सरकार स्थापन करु शकतो. त्यामुळे संख्याबळ जमवण्यासाठी सर्वच पक्ष आता हालचाली करत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) मोठा दणका बसला आहे. तब्बत 51 आमदार शिंदे गटात असल्याने बहुमत कसं सिद्ध करायचं असा पेच ठाकरे सरकार समोर आहे. Gulabrao Patil Shiv sena : आयत्या बिळावर नागोबावाला मी नाही गुलाबराव पाटलांचा मुख्यमंत्र्यावर रोख बंडखोर आमदारांशिवाय सध्याच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमताचा आकडा गाठणे अशक्य आहे. तर शिंदे गट मात्र भाजप सोबत जात सरकार स्थापन करु शकतो ही दाट शक्यता आहे. त्यामुळे जरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संख्याबळ असल्याचे दावे केले जात असले तरी त्यात किती तथ्य आहे हे उद्या समोर येईल.  या सर्व परिस्थितीत सध्याच्या विधानसभेतील एकूण आकडेवारीवर एक नजर टाकूया. महाविकास आघाडी >> शिवसेना - 16 >> राष्ट्रवादी काँग्रेस- 53 >> काँग्रेस - 44 >> एकूण- 113 भाजप+शिंदे गट >> शिंदे गट- 39 >> भाजप- 106 >> एकूण- 144

शिंदे गटाच्या स्वागतासाठी भाजपाची फिल्डिंग, मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन

अजित पवार, छगन भुजबळ बहुमत चाचणीला गैरहजर राहणार? उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीला (Floor Test) गैरहजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे दोन्ही प्रमुख नेते सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचं असताना दोन्ही नेते उपस्थित राहणार की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीबाबत काही वेगळी व्यवस्था केली जाते का हे देखील पाहावं लागेल. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे देखील उद्या उपस्थित राहणार की नाही याकडे लक्ष आहे. याबाबत नवाब मलिक, अनिल देशमुखांची सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली नव्हती.
Published by:Pravin Wakchoure
First published:

Tags: BJP, Eknath Shinde, Shivsena, Uddhav thacakrey

पुढील बातम्या