मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कोण होणार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष? काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक

कोण होणार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष? काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक

दुपारी 4 वाजेपासून काँग्रेस आमदारांना भेटणार असून त्यांच्याशी स्थानिक निवडणूक, प्रदेश अध्यक्ष याबाबत चर्चा केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

दुपारी 4 वाजेपासून काँग्रेस आमदारांना भेटणार असून त्यांच्याशी स्थानिक निवडणूक, प्रदेश अध्यक्ष याबाबत चर्चा केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

दुपारी 4 वाजेपासून काँग्रेस आमदारांना भेटणार असून त्यांच्याशी स्थानिक निवडणूक, प्रदेश अध्यक्ष याबाबत चर्चा केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई, 06 जानेवारी : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी  एच.के.पाटील (H K Patil) यांचा दोन दिवस मुंबई दौरावर आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीच्या संदर्भात चर्चा तसंच आगामी निवडणूक यावर मंथन केले जाणार आहे.

काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मंगळवारी रात्री  काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना सह्याद्री अतिथी गृहावर भेटले. यावेळी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर रात्री बैठक झाली. आज सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण भेटणार आहे. त्यानंतर सकाळी  11 वाजेपासून काँग्रेसच्या मंत्र्यांना प्रभारी भेटणार आहे. प्रत्येक मंत्र्याला भेटीला 15 मिनिट वेळ दिला आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष नवीन नियुक्त कोण असावा कसा असावा, राज्यातील स्थिती याचा आढावा घेतला जाणार आहे.

3 सिंहांनी घेरलं पण हार मानली नाही; हिंंमतवाल्या मुंगुसाचा VIDEO VIRAL

दुपारी 4 वाजेपासून काँग्रेस आमदारांना भेटणार असून त्यांच्याशी स्थानिक निवडणूक, प्रदेश अध्यक्ष याबाबत चर्चा केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मनस्थिती केली, त्यात आता नवीन प्रदेश अध्यक्ष देताना प्रादेशिक, सामाजिक, जातीय, राजकीय गणित विचार करून दिले जाईल असं समजते. राज्यातील काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांना व्यक्तिगत भेटी घेऊन महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील त्यांची मतं जाणून घेणार आहेत.

साखर खाऊ शकत नाही म्हणू गोड खाण्याची इच्छा मारू नका; तुमच्यासाठी आहेत 5 पर्याय

त्यात प्रदेशाध्यक्ष स्वरूपात कोण असावे कशा स्वरूपाचं काम केलं जावं, काय अपेक्षा आहेत. तसंच राज्यातील महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्युत्तर देताना राज्यात काँग्रेस पक्ष कशा स्वरूपात वाढवावा या संदर्भात देखील मंत्री आणि राज्य मंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे.

तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांना दणका, 8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदी

राज्यात पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यात कोल्हापूर औरंगाबाद नवी मुंबई महापालिका समवेतच नगरपालिका नगरपरिषद या निवडणुका देखील आहेत, त्यावेळी महाविकास आघाडी समवेत एकत्रित जावे की काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवावी याची देखील चाचपणी काँग्रेस प्रदेश प्रभारी एस के पाटील करणार असल्याची माहिती आहे. राज्यात काँग्रेसने नवीन प्रदेशाध्यक्ष द्यायचा असेल तर तो कोणता विभागातून असावा तसेच जातीय समीकरण देखील विचार केला जाईल असं समज तं.

First published: