बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार ?, अजय देवगण की नवाजुद्दिन ?

बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार ?, अजय देवगण की नवाजुद्दिन ?

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बायोपिक सिनेमात नवाजुद्दिन सिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत झळकणार अशी चर्चा इतके दिवस रंगत होती. पण या बातमीला कलाटणी मिळाली असून आता अजय देवगण बाळासाहेबांची भूमिका साकारणार अशी चर्चा जोर धरत आहे.

  • Share this:

21 डिसेंबर, मुंबई : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बायोपिक सिनेमात नवाजुद्दिन सिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत झळकणार अशी चर्चा इतके दिवस रंगत होती. पण या बातमीला कलाटणी मिळाली असून आता अजय देवगण बाळासाहेबांची भूमिका साकारणार अशी चर्चा जोर धरत आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार बाळासाहेबांची भूमिका बॉलिवूडचा लाडका सिंघम अजय देवगण वठवणार अशी चर्चा आहे. आज संध्याकाळी अमिताभ बच्चन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा चित्रपट लाँच करणार आहेत. या सिनेमाचं नाव 'साहेब' आहे असं समजतंय.

राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याची पटकथादेखील संजय राऊत यांनी लिहिली आहे. नवाजुद्दिन सिद्दिकीचं नाव गेल्या काही दिवसांत डागाळलंय ते 'अॅन ऑर्डिनरी लाईफ' या त्याच्या आत्मचरित्रामुळे. अभिनेत्री निहारिका सिंगसोबत विवाहबाह्य संबंध, न्यूयॉर्कच्या वेट्रेससोबत अनैतिक संबंध आणि अनेक बाबींमुळे नवाजुद्दिन सिद्दीकीवर अनेकांनी ताशेरे ओढले. खुद्द त्याच्या तथाकथित प्रेयसी सुनीता राजवर आणि निहारिका सिंग यांनीही या पुस्तकातील नवाजुद्दिनचा खोटेपणा उघडकीस आणला त्यानंतर नवाजुद्दिनला हे पुस्तक रद्द देखील करावं लागलं.

या सगळ्या प्रकारानंतर बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी तो योग्य नाही म्हणून बाळासाहेबांच्या बायोपिकमधून त्याचं नाव वगळण्यात आल्याचं कळतंय. पण बाळासाहेबांच्या भूमिकेत अजय देवगण की आणखी कुणी यावरील पडदा आज चित्रपटाच्या लाँचलाच उघडणार आहे.

First published: December 21, 2017, 3:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading