Home /News /mumbai /

अखेर मुंबईत झाली MIM ची सभा, जलील यांनी ठाकरे सरकारला विचारला थेट सवाल

अखेर मुंबईत झाली MIM ची सभा, जलील यांनी ठाकरे सरकारला विचारला थेट सवाल

मुंबईमध्ये रॅली आणि मोर्चा काढण्यास मनाई असताना सुद्धा MIM ची सभा अखेर मुंबईमध्ये पार पडली.

मुंबईमध्ये रॅली आणि मोर्चा काढण्यास मनाई असताना सुद्धा MIM ची सभा अखेर मुंबईमध्ये पार पडली.

मुंबईमध्ये रॅली आणि मोर्चा काढण्यास मनाई असताना सुद्धा MIM ची सभा अखेर मुंबईमध्ये पार पडली.

    मुंबई, 11 डिसेंबर : मुंबईमध्ये रॅली आणि मोर्चा काढण्यास मनाई असताना सुद्धा MIM ची सभा अखेर मुंबईमध्ये पार पडली. यावेळी वक्फ बोर्डाची हजारो कोटींची जमीन कुणी लाटली? असा सवाल MIM चे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी राज्य सरकारला विचारला आहे. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. वक्फ बोर्डाची जमीन आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर इम्तियाज जलील यांनी मुंबईत वाहन रॅली काढली होती. दिवसभर अनेक ठिकाणी पोलिसांनी जलील यांच्या रॅलीतील वाहनांना अडवून तपासणी केली. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांसोबत बाचाबाची झाली तर कुठे समर्थकांना परत पाठवण्यात आले. पण, जलील आपल्या समर्थकांसह मुंबईत दाखल झाले. मुंबईतील चांदिवलीमध्ये सभा पार पडली. यावेळी MIM चे अध्यक्ष आणि खासदार असाउद्दीन ओवेसी (asaduddin owaisi)  आणि अकबरुद्दीन ओवेसी या दोन्ही भावांची जोरदार भाषणं झाली. तर जलील यांनी आपल्या भाषणात सरकारवर थेट हल्लाबोल चढवला. News18 Exclusive : 'विराट नसतानाही रोहितने...', सौरव गांगुलीचं सूचक विधान मराठा आरक्षणासाठी सगळे मैदानात उतरले होते. मात्र मुस्लीम आरक्षणासाठी कोणी साथ दिली नाही, असं म्हणत  इम्तीयाज जलील यांनी आरोप केला. 'अनेक अडथळे टाकले मी पार करून आलो. पण इमानदारीचा प्रयत्न नेहमी यश देतो. काही फिल्म दाखवून मुस्लिमांना कसं वापरलं जातंय ते दाखवला जाणार आहे. पण समाजातील लोकांसाठी 100 नाही 200 टक्के राजकारण करणार आहे. या रॅलीत लोक स्वतः इथे आले आहेत कुणालाही गाडी नाही दिली, कुणालाही पेट्रोल नाही दिले, असंही जलील म्हणाले. मुस्लिम समाजातील अनेक बांधवांची हक्काची असलेली  वक्फ बोर्डाची हजारो कोटींची जमीन कुठे गेली. 9 जणांवर गुन्हे आता दाखल केले आहे. पैशांच्या जोरावर जमिनी हडपल्या. त्याच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत, असा खुलासाही जलील यांनी केला. या' माशात अडकलाय सर्वांचा जीव! ग्राहक 3 लाख देतायेत तरी मालक विकायला तयार नाही दरम्यान, पोलिसांनी मुंबई रॅली घेण्यास आधीच मनाई केली होती. पण तरीही नियम मोडून ही सभा घेण्यात आली. या रॅलीनंतर पोलीस काय कारवाई करणार आहे, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या