मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नारायण राणेंच्या अटकेचे आदेश कुणी दिला? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् अनिल परबांनी घेतला निर्णय?

नारायण राणेंच्या अटकेचे आदेश कुणी दिला? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् अनिल परबांनी घेतला निर्णय?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय कोणाचा? यावरुन आता मोठी माहिती समोर येत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय कोणाचा? यावरुन आता मोठी माहिती समोर येत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय कोणाचा? यावरुन आता मोठी माहिती समोर येत आहे.

    मुंबई, 25 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या विरोदात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटकही झाली. रात्री उशिरा नारायण राणेंना न्यायालयाने जामीनही मंजूर केला. मात्र, आता या अटकेमागची कहाणी समोर आली आहे. नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय हा सोमवारी रात्रीच झाला असल्याचं वृत्त समोर येत आहे.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जपण्यासाठी तसेच यापुढे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशाप्रकारचं कुणीही वक्तव्य करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर नारायण राणेंना अटक करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मंगळवारी नारायण राणे यांना अटक करण्यात आली.

    गेल्या दीड वर्षांत जेव्हापासून मविआ सरकार सत्ते आल्यापासून भाजपचं सर्वात मोठं टार्गेट उद्धव ठाकरे राहिले आहेत. नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणखीनच जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात झाली. येत्या निवडणुका लक्षात घेता नारायण राणेंच्या अटकेची ही रणनिती आखली गेली असल्याचं बोललं जात आहे.

    नारायण राणेंसमोर नवं संकट

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. नारायण राणेंना आता नाशिक पोलिसांकडून नोटीस आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यानुसार नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूणच नारायण राणेंच्या समोर आता नवं संकट उभ राहिल्याचं दिसत आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस ठाण्यातही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच संदर्भात नाशिक पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस बजावली असून 2 सप्टेंबर रोजी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. नाशिकमध्ये दाखल गुन्ह्याच्या संदर्भात जबाब घेण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस दिली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Anil parab, Narayan rane, Uddhav thackeray