भाजपमध्ये आता प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, ही नावं आहेत चर्चेत!

भाजपमध्ये आता प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, ही नावं आहेत चर्चेत!

मात्र अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार असून अमित शहा हेच त्याबाबत फैसला करणार असल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

मुंबई 08 डिसेंबर : महाराष्ट्रातली सत्ता गेल्याने भाजपला मोठा धक्का बसलाय. या धक्क्यातून सावरत असतानाच आता भाजपच्या अंतर्गत निवडणुकांच्या हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांमुळे भाजपच्या महाराष्ट्रातल्या पक्षांतर्गत निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता त्याची प्रक्रिया सुरू झालीय. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळही जानेवारी महिन्यात संपणार आहे. 1 ते 5 जानेवारी दरम्यान नव्या अध्यांची घोषणा होईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनीच आज दिली. त्यामुळे भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होईल याची उत्सुकता निर्माण झाली असून पक्षात या पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचीही चर्चा आहे. रावसाहेब दानवे यांची मुदत संपल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पाटील हे पक्षात ज्येष्ठ असले तरी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या अत्यंत विश्वासातले अशी त्यांची ओळख आहे.

सत्ता नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आले एकत्र

त्यामुळे पाटील यांना थेट असं कुणाचच आव्हान नव्हतं. त्यामुळेच त्यांना थेट दुसऱ्या क्रमांकाचं स्थानही मिळालं होतं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जाईल असंही बोललं जातंय. पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फारसं सख्य नाही अशाही बातम्या येत होत्या मात्र दोघांनीही त्याचं खंडण केलं होतं. आता नव्याने काही नावांची चर्चा पुन्हा सुरू झालीय. परळीत पराभव झाल्यानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल अशीही एक चर्चा आहे. पंकजा या मास लिडर असल्याने त्याचा फायदा होईल असंही बोललं जातंय.

'एकनाथ खडसे बंड करणार नाहीत, त्यांच्या मनातली खदखद स्वाभाविक'

मात्र विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यांची अतिमहत्त्वाकांक्षी अशी प्रतिमा त्यांच्या आड येवू शकते. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही याआधी प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं होतं. गडकरी यांच्या जवळचे असल्याने त्यांचाही विचार होऊ शकतो. किंवा पुन्हा रावसाहेब दानवे यांच्यावरही जबाबदारी टाकली जाऊ शकते. मात्र अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार असून अमित शहा हेच त्याबाबत फैसला करणार असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 11:21 PM IST

ताज्या बातम्या