मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आधी नक्षलवादाचं कंबरडं मोडलं नंतर सोलापुरातील दंगली थांबवल्या, मुंबईचे नवे CP हेमंत नगराळे नक्की कोण आहेत?

आधी नक्षलवादाचं कंबरडं मोडलं नंतर सोलापुरातील दंगली थांबवल्या, मुंबईचे नवे CP हेमंत नगराळे नक्की कोण आहेत?

ठाकरे सरकारने थेट मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai Police Commissioner) बदली करण्याचा निर्णय घेतला आणि या पदावर हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) यांची नियुक्ती केली आहे.

ठाकरे सरकारने थेट मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai Police Commissioner) बदली करण्याचा निर्णय घेतला आणि या पदावर हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) यांची नियुक्ती केली आहे.

ठाकरे सरकारने थेट मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai Police Commissioner) बदली करण्याचा निर्णय घेतला आणि या पदावर हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई, 17 मार्च : मुंबईतील हाय प्रोफाइल भागात स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि याबाबतच मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांना अटक झाली. त्यानंतर राज्य सरकार आणि गृहविभागावर टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे सरकारने थेट मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai Police Commissioner) बदली करण्याचा निर्णय घेतला आणि या पदावर हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) यांची नियुक्ती केली आहे. सरकार अडचणीत आलेलं असताना आयुक्तपदाची धुरा ज्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली ते हेमंत नगराळे नक्की कोण आहेत, याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे (Chandrapur) असून येथील भद्रावती जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केलं. 1987 बॅचच्या महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्यावर आता मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयपीएस झाल्यानंतर त्यांच्यावर पहिली मोठी जबाबदारी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यात देण्यात आली. तेथे त्यांच्यावर ASP ची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1992 ते 1994 या काळात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात डीसीपीचा कार्यभार सांभाळला आणि 1992 ते 1993 च्या दंगली दरम्यान सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवली.

हेही वाचा - सचिन वाझेंची गाडी NIAकडून जप्त, सापडलं धक्कादायक मशीन आणि 5 लाख रुपये

1994 ते 1996 दरम्यान रत्नागिरीचे एसपी म्हणून दाभोल पॉवर कॉर्पोरेशनशी संबंधित जमीन अधिग्रहण प्रकरणही त्यांनी योग्य पद्धतीने सोडवलं. 1996 ते 1998 या काळात सीआयडी क्राइमचे एसपी म्हणून राज्यभर पसरलेल्या MPSC पेपर लीक घोटाळ्याचा त्यांनी मूळापर्यंत तपास केला. या पदावर असताना त्यांनी अनेक क्राईम केसेस सोडवल्या आणि पीडितांना न्याय दिला.

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे हेमंत नगराळे यांच्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळताना अनेक आव्हानं समोर असणार आहेत. सचिन वाझे प्रकऱणामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर लागलेला डाग पुसून काढत शहरात कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची तारेवरची कसरत नगराळे यांना करावी लागणार आहे. यामध्ये ते कसे यशस्वी ठरतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai police, Paramvir sing