VIDEO: उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ दाखवलेले कोण आहे दुष्यंत चौटाला?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 08:14 PM IST

VIDEO: उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ दाखवलेले कोण आहे दुष्यंत चौटाला?

मुंबई, 08 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंप्रमाणे लाव रे व्हिडिओ म्हणत त्यांनी दुष्यंत चौटाला यांचे व्हिडिओ दाखवले.

तर उद्धव ठाकरे यांनी ज्या दुष्यंत चौटाला यांचा उल्लेख केला होते ते हरियाणाची उपमुख्यमंत्री आहे. जननायक जनता पार्टीचे सर्वेसर्वा असलेले दुष्यंत चौटाला यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलीच टक्कर दिली होती. त्यावेळी त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. परंतु, सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी भाजपने दुष्यंत यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्यात आलं.

विशेष म्हणजे, हरियाणामध्ये भाजपला 40 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या. तर जजपा यांना 10 जागा मिळाल्या होत्या. पण कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यानंतर भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जजपा पक्षासोबत युती केली. याबद्दल्यात त्यांना उपमुख्यमंत्रिपदही दिले आणि काही मंत्रिपद, मंडळवर सचिवपदीही दिली आहे.

Loading...

याचाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी दुष्यंत चौटाला यांचे भर पत्रकार परिषदेत व्हिडिओ क्लीप दाखवले.

दरम्यान, भाजपने नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप चुकीचं असल्याचं सांगितलं. तसंच राम मंदिराचा मुद्दा हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असंही ते म्हणाले.

===================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...