• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • घाटकोपर इमारत दुर्घटना ; कोण आहे सुनील सितप ?

घाटकोपर इमारत दुर्घटना ; कोण आहे सुनील सितप ?

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील 17 लोकांच्या मृत्यूला आरोपी सुनिल सितपच जबाबदार आहे. तळमजल्यावरच्या नर्सिंग होमचं नुतनीकरण करताना त्याने इमारतीच्या मूळ ढाचाला धक्का पोचवलाय. या दुर्घटनेतला आरोपी सुनील सितप हा शिवसेनेचा जुना पदाधिकारी आहे.

  • Share this:
मुंबई, 26जुलै : घाटकोपर इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनील सितपला अटक केलीय त्यानेच नर्सिंग होमचं नुतनीकरण करण्याच्या नादात इमारतीच्या मूळ ढाचाला धक्का पोचवल्याचा आरोप होतोय. इमारतीचे पिलर्स तोडले गेल्यानेच ही इमारत कोसळल्याची माहिती पुढे आलीय. म्हणून प्रशासनाने घाटकोपर इमारत दुर्घटनेतील 17 लोकांच्या मृत्यूला आरोपी सुनिल सितपला जबाबदार धरत रात्रीच त्याच्यावर अटकेची कारवाई केलीय. हा सुनील सितप शिवसेनेचा जुना पदाधिकारी आहे. कोण आहे सुनील सितप ? - सुनील सितप शिवसेनेचा जुना पदाधिकारी - उद्योग सेनेचा पदाधिकारी - रायगडहून विधानसभेसाठी तिकीट मागितलं - पत्नीचा बीएमसी निवडणुकीत पराभव - बीएमसीचा अर्ज भरताना २८ कोटीची मालमत्तेची नोंद - घाटकोपरच्या अमृत नगरमध्ये राहतो - भूमाफिया म्हणून सर्वश्रृत
First published: