Home /News /mumbai /

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री व्हाया बंडखोरी! एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री व्हाया बंडखोरी! एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

भाजपने एकनाथ शिंदे गटाला बाहेरुन पाठींबा दिला असून शिंदे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

    मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत (shivsena) राजकीय वादळ निर्माण झालं होतं. अखेर यानंतर काल (29 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र, भाजपने बाहेरुन पाठींबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिली आहे. लवकरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मात्र, एकनाथ शिंदे यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. यानिमित्ताने त्यावर एक नजर टाकू. ज्या ठाणे जिल्ह्यातून शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. त्या जिल्ह्यात शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे यांचीच पकड आहे. यासोबत राज्यातील अनेक जिल्ह्यातील आमदार शिंदे यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांचा इथपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. चला यानिमित्ताने जाणून घेऊया. रिक्षाचालक ते मंत्री... रिक्षाचालक ते शिवसेना गटनेते असा एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आनंद दिघे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्ह्यात शिवसेना संपल्याचे चित्र असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख या नात्याने शिवसेना एकसंध ठेऊन मजबूत केली. यामुळे 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. तसेच, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळवण्यात हातभार लागला. राज्यातील विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका आहे. यामुळेच शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यानंतर एकनाथ शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा आनंद दिघे यांच्यामुळे राजकारणात.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980 च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवून उदरर्निवाह करत होते. 1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. सीमा आंदोलनात तुरुंगवास झाला. 1997 मध्ये पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड झाली. 2001 मध्ये सभागृहनेतेपदी निवड झाली होती. सलग तीन वर्षे पद सांभाळले. 2004 मध्ये तत्कालीन ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2005 साली शिवसेनेचे ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले. 2014 साली विधानसभेसाठी विजयाची हॅटट्रिक केली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आता मुख्यमंत्री.. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता भाजपने शिंदे गटाला बाहेरुन पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असल्याचं फडणवीस यांनी घोषित केलं आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या