S M L

मुंबईचा खरा वाली कोण, केव्हा संपणार नागरिकांची दशा?

विकास कामांसाठी अनेक संस्थांची परवानगी घ्यावी लागत असल्याने विकास कामे खोळबंतात आणि कुणावरही जबाबदारी टाकता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी हाल किती काळ सोसायचे असा सवाल मुंबईकरांनी व्यक्त केलाय.

Ajay Kautikwar | Updated On: Jul 3, 2018 08:20 PM IST

मुंबईचा खरा वाली कोण, केव्हा संपणार नागरिकांची दशा?

मुंबई,ता.3 जुलै : मुंबईचा वेगानं विकास करायचा असेल तर मुंबईत काम करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये समन्वय करणारी यंत्रणा पाहिजे असं मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अंधेरीतला रेल्वे पुल कोसळल्यानंतर विविध संस्थांनी जबाबदारी एकमेकांवर ढकलल्याने ही गरज पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. रेल्वेच्या हद्दीत असलेल्या पादचारी रेल्वे पुलाची जबाबदारी ही महापालिकेची होती की रेल्वेची यावरूनही वाद झाला.

एक कोटींपेक्षा जास्त असलेली लोकसंख्येमुळं सर्व व्यवस्थांवर पडणारा ताण आणि त्यातुन मुंबईची झालेली दशा याचा वाईट परिणाम मुंबईवर होत आहे. तर प्रचंड पैसा असल्याने मुंबईवरचा अधिकार सोडायला कुणीही तयार नाही. त्यातच भाजप आणि शिवसेनेचे मतभेद झाल्यानं त्याचा परिणाम मुंबईच्या विकासावर झाला. मुंबईत काम करणाऱ्या यंत्रणांमध्ये नसलेला समन्वय. कणखर नेतृत्वाचा आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळं मुंबईची गाडी रूळावरून घसरली आहे.

राज्य सरकार, मुंबई महापालिका, एमएमआरडीए, म्हाडा, सीआरझेड अशा विविध संस्थांचं राज्य मुंबईवर आहे. विकास कामांसाठी अनेक संस्थांची परवानगी घ्यावी लागत असल्याने विकास कामे खोळबंतात आणि कुणावरही जबाबदारी टाकता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी हाल किती काळ सोसायचे असा सवाल मुंबईकरांनी व्यक्त केलाय.

घटना घडली की घटनास्थळाला भेट द्यायची, घोषणा करायची आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या असं गेली कित्येक वर्ष सुरू आहे. त्यामुळं मुंबईचा खरा वाली कोण असा प्रश्न मुंबईकरांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा...

Loading...

हजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन 'चंद्रशेखर सावंत'

महाराष्ट्रात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा

पूल कोसळून पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत, जाणून घ्या या महत्त्वाच्या 10 गोष्टी

रेणुका शहाणेला मुंबईची काळजी पण लोकांनी म्हटलं 'काँग्रेसवाली', ट्विटरवर ट्रोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 08:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close