मुंबई 10 जून: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत कोरोना विरुद्धच्या लढाईत यश मिळत असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी चार गोष्टी चांगल्या असून ती आकडेवारी बघितली तर दिलासादायक चित्र समोर येतं. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या हवाल्याने आदित्य ठाकरे यांनी काही गोष्टींची आकडेवारी देत परिस्थिती गंभीर असली तरी नियंत्रणात असल्याचं सूचित केलं आहे.
मुंबईत मंगळवारी 1015 नवे कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यामुळे एकूण 50 हजार 878 एवढी झाली आहे. तर 58 मृत्यूची नोंद झाली होती. मृत्यूची एकूण संख्या 1758 एवढी झाली आहे. तर सध्या मुंबईतील 775 चाळी आणि झोपडपट्टी या कंन्टेंमेंट झोनमध्ये आहेत. तर 4071 इतक्या इमारती सध्या (सक्रिय) सील करण्यात आल्या आहेत. ही परिस्थिती असली तरी काही चांगल्या गोष्टीही आहेत.
आदित्य ठाकरेंनी सांगितल्या या चार गोष्टी
1. मुंबईचा डबलिंग रेट 5 दिवस. (राष्ट्रीय सरासरी 16 दिवस)
2. मृत्यू दर कमी होऊन 3% झाला आहे (जवळपास राष्ट्रीय सरासरीइतके)
3. डिस्चार्ज रेट: 44%
4. धारावीतील डबलिंग रेट: 42 दिवस
आज @mybmc च्या आयुक्तांकडून एक चांगली बातमी:
काल पर्यंत,
१. मुंबईचा डबलिंग रेट २४.५ दिवस. (राष्ट्रीय सरासरी १६ दिवस)
२. मृत्यू दर कमी होऊन ३% झाला आहे (जवळपास राष्ट्रीय सरासरीइतके)
३. डिस्चार्ज रेट: ४४%
४. धारावीतील डबलिंग रेट: ४२ दिवस
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 10, 2020
देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात असा अंदाज वर्तविला जात होता की उन्हाळ्यात गर्मीमुळं कोरोना नष्ट होईल, मात्र असे काही घडले नाही. आता या सगळ्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (IIT) मुंबईनं कोरोनाचा संसर्ग आणि हवामानातील बदलाचा अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये असे नोंदवले गेले आहे की पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगानं होण्याची शक्यता आहे. अभ्यासानुसार आर्द्रता वाढल्यास कोरोना जास्त काळ वातावरणात राहू शकतो.
हे वाचा - बड्या नेत्यांमुळेच उलटवलं काँग्रेस सरकार, शिवराजसिंहांची Audio Clip व्हायरल
आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी कोरोनाव्हायरसवर अभ्यास केला आहे. दोन्ही प्राध्यापकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या शिंकेतून निघणाऱ्या ड्रॉपलेटचा अभ्यास केला. त्यानंतर या ड्रॉपलेटच्या कोरड्या होण्याच्या गतीची आणि जगातील 6 शहरांमध्ये दररोज होणाऱ्या संसर्गाची तुलना केली. रजनीश भारद्वाज यांना असे आढळले की कोरड्या वातावरणापेक्षा आर्द्रता क्षेत्रात विषाणूचा अस्तित्व दर 5 पट जास्त आहे. अशा परिस्थितीत लवकरच मुंबईत मान्सून धडकणार आहे, त्यामुळं कोरोनाचा धोका अधिक आहे.
हेही वाचा -
दिलासादायक! 'या' शहरात विकसित होतेय कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी
महिलेकडून जबरदस्तीनं वसूल केला कर्जाचा हफ्ता, कंपनीला शिवसैनिकांनी शिकवला धडा