महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रुग्णांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रुग्णांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

अनेक रुग्णालय मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातेवाइकांकडून आर्थिक लूट करत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती.

  • Share this:

मुंबई, 22 मे : राज्यात कोरोना विषाणू रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे अनेक सरकारी यासह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात अनेक ठिकाणी या उपचार पद्धती करत असताना त्याची दर निश्चिती नसल्याने अनेक रुग्णालय मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातेवाइकांकडून आर्थिक लूट करत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. त्यामुळे आता राज्य सरकारच्या वतीने याबाबत एक आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी याबाबत आदेश काढले आहेत. राज्यातील नर्सिंग होम कोव्हिड रूग्णाची लूट होत असल्याने सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्रातील सर्व दवाखाने, नर्सिंग होम, कॉर्पोरेट नर्सिंग होम, चॅरिटेबल हॉस्पिटल यांना बंधनकरारक आहे. या हॉस्पिटल मधील 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिले गेले असून तिथे रुग्ण पाठविण्याबाबत अंतिम अधिकार जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्या अखत्यारित असतील. 

कोव्हिड रुग्णांबाबत 3 स्लॅब तयार करण्यात आले असून 4 हजार, 7 हजार 500 आणि 9 हजार रुपये अशी दर आकारणी करण्यात येईल. संबंधित हॉस्पिटलला यातील किमान दर घ्यायचे. या करारात न येणारे त्या त्या जिल्हात अधारित दर जाहीर केले आहेत. त्यानुसार उपचारासाठी पैसे आकारले जातील.

हेही वाचा - धोकादायक कोरोना मृत शरीरात किती काळ राहतो? तपासण्यासाठी भारत करणार नवा प्रयोग

सध्या या विषाणूचा संकट सगळ्यांकडे असून रुग्णालय त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्याला चाप बसावा यासाठी राज्य सरकारने भलेही प्रयत्न केले असले तरी मात्र भविष्यात अनेक रुग्णालय रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करणार नाहीत. याबाबत देखील कटाक्षाने लक्ष ठेवावं लागणार आहे. 

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 22, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading