अजित पवार गेले कुठे? तासाभरापूर्वी केलं 'हे' ट्विट

राजीनाम्याचं वृत्त आल्यानंतर सर्वच नेते अजित पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र दादांचा फोन बंद आहेत. त्याचबरोबर दादांच्या सर्व पीएचे फोन्सही बंद आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 07:45 PM IST

अजित पवार गेले कुठे? तासाभरापूर्वी केलं 'हे' ट्विट

मुंबई 27 सप्टेंबर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप आलाय. दादांचा हा निर्णय पक्षात कुणालाही माहित नव्हता. राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि प्रवक्ते यांनाही माध्यमातूनच ही माहिती कळाली असं त्यांनीच सांगितलंय. त्यामुळे दादा नेमके कुठे गेले याची जोरदार चर्चा सुरू झालीय. गेल्या दोन दिवसांपासून दादा एकांतातच आहेत. EDने गुन्हा नोंदविल्यानंतर शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र अजित पवार फारसे बोलले नाहीत. राजीनाम्याचं वृत्त आल्यानंतर सर्वच नेते अजित पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र दादांचा फोन बंद आहेत. त्याचबरोबर दादांच्या सर्व पीएचे फोन्सही बंद आहेत.

खुद्द पार्थ पवार यांनी माध्यमांना माहिती देताना अजित पवारांचा निर्णय आधी माहित नसल्याचं सांगितलं. त्याचबरोबर दादा नेमकं कुठे आहेत हेही माहित नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे दादांच्या राजीनाम्याचं गूढ वाढलं आहे. आपल्या राजीनाम्याची बातमी बाहेर आल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटतील याची दादांना जाणीव होती त्यामुळेच त्यांनी आपले फोन बंद केले असावेत अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.

..यावरून नाराज आहेत अजित पवार, म्हणूनच दिला अचानक राजीनामा?

तासाभरापूर्वी अजित पवारांनी एक ट्विट करून शरद पवारांना पाठिंबा दिला होता. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आज,मुंबईत आदरणीय शरद पवार साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर, दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील,याची खात्री आहे.

Loading...

नेमकं काय झालं?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिलाय. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवारांचा राजीनामा मंजूर केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात झाली असतानाच पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार 'नॉट रिचेबल' आहेत. त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलंय. त्यामुळे नेमकं काय झालं याबद्दल सस्पेन्स वाढला असून राष्ट्रवादीत भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी ई मेलवरून बागडेंना राजीनामा पाठवला आणि त्यांच्याशी फोनवर बोलून घेतलं. अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याविरुद्ध ED ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. राजीनामा पत्रात कारण नाही दिलेले, फक्त राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली. विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर केला.

अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात, गूढ वाढलं

ED ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवारांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे दिसले नाहीत. ते निर्णय प्रक्रियेपासून दूर होते. पक्षातल्या काही घडामोडींमुळे ते नाराज असल्याची चर्चाही आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात अस सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होत. पवार कुटुंबीयांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये मतभेद होते अशीही चर्चा आहे. पार्थ पवार याच्या उमेदवारी आणि पराभवातून सुनेत्रा पवार ही होत्या नाराज होत्या असं बोललं जातं. राणा जगजितसिंह यांचा भाजप प्रवेश सुनेत्रा आणि अजित पवार यांच्या सल्ल्यानेच झाल्याचीही चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...