• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • aryan Khan सोबत सेल्फी कुठे काढला? अखेर किरण गोसावीने दिली कबुली, म्हणाला...

aryan Khan सोबत सेल्फी कुठे काढला? अखेर किरण गोसावीने दिली कबुली, म्हणाला...

'क्रुझवर जेव्हा कारवाई करण्यात आली होती, त्याआधी मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार..'

'क्रुझवर जेव्हा कारवाई करण्यात आली होती, त्याआधी मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार..'

'क्रुझवर जेव्हा कारवाई करण्यात आली होती, त्याआधी मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार..'

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : क्रुझवर जाऊन धडक कारवाई करून ड्रग्स प्रकरणी सुपरस्टार शाहरुख खानचा (sharukh khan) मुलगा आर्यन खानला अटक (aryan Khan arrest case)  करण्यात आली. या कारवाई दरम्यान किरण गोसावी हा सर्वात पुढे असल्याचं दिसून आलं आहे. आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर किरण गोसावीने सेल्फी काढला होता. या सेल्फीमुळेच किरण गोसावी (Kiran Gosavi) , मनिष भानुशाली (manish bhanushali) अडचणीत सापडले. अखेर या सेल्फीबाबत खुद्ध किरण गोसावीने खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांचे फोटो प्रसिद्ध करून आरोपांची मालिका सुरू केली. त्यामुळे एनसीबी आणि समीर वानखेडेंची पार कोंडी झाली. या आरोपांच्या मालिकेदरम्यान किरण गोसावी अचानक गायब झाला होता. अखेर आज तो समोर आला. त्याने क्रुझवर कशा प्रकारे कारवाई केली होती आणि प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांना CNN News 18 शी बोलताना खुलासा केला आहे. नोकरी करून दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; Time Management पाहून थक्क व्हाल! 'क्रुझवर जेव्हा कारवाई करण्यात आली होती, त्याआधी मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार मी एनसीबीला माहिती दिली होती. त्यानंतर क्रुझवर कारवाई करण्यात आली होती. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता तर तो क्रुझवर काढला होता, असा दावाही गोसावी याने केला आहे. त्याचबरोबर प्रभाकर साईल याने 25 कोटींच्या खंडणीचे केले आरोप हे निराधार आहे. मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेट झाली नाही, त्यामुळे अशी कोणतीही खंडणी मागितली नव्हती, असा दावाही त्याने केला.

  मागवला आयफोन, आला साबण! पण ग्राहक ठरला चोरावर मोर

  'माझ्या जीवाला धोका आहे, आर्यन खानला अटक केल्यानंतर  3 ऑक्टोबरनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर सध्या राजकारण सुरू आहे, माझ्या जीवा धोका असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे, असंही किरण गोसावी म्हणाला. समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ तर दुसरीकडे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB zonal director sameer wankhede) यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई संशयास्पद असल्याचा आरोपी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. यानंतर आता समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उद्या एनसीबीचं दिल्लीतील एक पथक मुंबईला येणार आहे. हा पथकात  NCB चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यासह अन्य दोन इन्स्पेक्टर पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
  Published by:sachin Salve
  First published: