राज्यात सप्टेंबर अखेरीस शाळा सुरू होणार? शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यात सप्टेंबर अखेरीस शाळा सुरू होणार? शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

बहुतेक शिक्षक, संस्थाचालक यांनी ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाढत आहे. त्यामुळे शाळा तुर्तास सुरू करण्सास हरकत घेतली आहे

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत हळूहळू उद्योग धंदे आणि सार्वजनिक ठिकाणे खुली करण्यात आली आहे. परंतु, शाळा कधी सुरू होणार याबद्दल अनिश्चितता कायम आहे. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी  सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.

केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून ज्या संस्था शाळा सुरू करू शकतात, त्यांनी सुरू कराव्यात असं म्हटले आहे.  पण राज्यातील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील संस्थाचालक तसंच शिक्षण तज्ज्ञांसोबत चर्चा केली. यात बहुतेक शिक्षक, संस्थाचालक यांनी ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाढत आहे. त्यामुळे शाळा तुर्तास सुरू करण्सास हरकत घेतली आहे. याबद्दल आता राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे.

ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

तुर्तास इयत्ता 10 आणि 9 वी तुकड्यां सुरू करण्याचा विचार नाही, अशी माहिती  वर्षा गायकवाड यांनी दिली. शहरी भागास ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाढत असल्याने सप्टेंबर अखेर शाळा सुरू करण्याबाबत बहुतेक प्रतिकूल मतं आहे, असं ही गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान,  काही दिवसांपूर्वी केंद्राने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले. असे असले तरी ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगला यापुढेही परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे.

अंतिम परीक्षेबाबत 'या' विद्यापीठाने तयार केलेले मॉडेल राज्यात अग्रस्थानावर

असे असताना विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक असणार आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहेत. केंद्र सरकारने या नियमांमध्ये असे नमूद केले आहे की कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर शाळा खुली करण्याची परवानगी असेल.

Published by: sachin Salve
First published: September 15, 2020, 7:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading