महाराष्ट्रातील शाळा कधी उघडणार? लॉकडाऊनच्या निर्णयानंतर हालचालींना वेग

महाराष्ट्रातील शाळा कधी उघडणार? लॉकडाऊनच्या निर्णयानंतर हालचालींना वेग

लॉकडाऊनच्या नव्या गाईडलाइननुसार राज्य सरकारने शाळा सुरू करण्सासंदर्भात निर्णय घ्यावा असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मे : केंद्र सरकाराने आज लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केली. या लॉकडाऊनच्या नव्या गाईडलाइननुसार राज्य सरकारने शाळा सुरू करण्सासंदर्भात निर्णय घ्यावा असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यानंतर आता राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची उद्या बैठक होणार आहे.

राज्यातील शिक्षण विभागात प्रमुख अधिकारी आणि मंत्री हे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक करून त्यानंतर महाराष्ट्रातील शाळा नेमक्या कधीपासून सुरू करायच्या, याबाबतचा निर्णय घेतील. मात्र साधार 15 जूनपासून राज्यात शाळा सुरू करणे कठीण असल्याचं चित्र आहे. त्यातही रेड झोन भागात याबाबतचा निर्णय घेणं जास्त अवघड आहे. ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देण्याचं प्राधान्याने काम लवकर सुरू करू, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

कसा असणार आहे लॉकडाऊनचा पाचवा टप्पा?

स्थानिक उड्डाण आणि मेट्रोच्या आंतरराष्ट्रीय कामकाजाचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल

हा लॉकडाऊन टप्पा 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे

जुलै महिन्यातील परिस्थितीनुसार शाळा, सिनेमा हॉलचा निर्णय घेण्यात येईल

रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत लोकांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे

दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड-19 चा संसर्ग टाऴण्यासाठी आतापर्यंत 4 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत असेल

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 30, 2020, 8:11 PM IST

ताज्या बातम्या