राज्य अनलॉक होत असताना मंत्रालयात सामान्य नागरिकांना कधी देणार प्रवेश?

राज्य अनलॉक होत असताना मंत्रालयात सामान्य नागरिकांना कधी देणार प्रवेश?

मंत्रालयात सामान्य नागरिकांना केव्हा प्रवेश देणार? असा सवाल करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस प्रवेश देण्याची विनंती केली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : मंत्रालयात सामान्य नागरिकांना आजही प्रवेश दिला जात नसून प्रवेशद्वारावरुन परतवून लावले जात आहे. मंत्रालयात सामान्य नागरिकांना केव्हा प्रवेश देणार? असा सवाल करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस प्रवेश देण्याची विनंती केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांस पत्र पाठवून निवेदन केले आहे की कोविड काळात मंत्रालयात अधिकारी-कर्मचारी वृंद नसल्याने प्रवेश दिला जात नव्हता.

आता परिस्थिती वेगळी असून मंत्रालयात उपस्थिती बंधनकारक आहे. परंतु सामान्य नागरिकांना विविध बाबीची तक्रार किंवा अन्य पत्रव्यवहारासाठी मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. प्रवेश द्वारावर विभागात पत्र घेण्यासाठी कोणी कर्मचारी नसल्याची सबब पुढे केली जाते प्रत्यक्षात सर्व विभागात कामकाज सुरू आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गेल्या 10 दिवसांत असा घटला कोरोनाचा आलेख

गलगली पुढे म्हणतात की, कोविडच्या पाश्वभूमीवर सरसकट प्रवेश दिला जात नाही, ही बाब योग्य आहे पण ज्या नागरिकांना पत्र देऊन सही व शिक्का घ्यायचा आहे. त्याची खातरजमा करत प्रवेश देण्याची आवश्यकता आहे. तरी याबाबतीत संबंधितांना मंत्रालयात सामान्य नागरिकांना पत्र रजिस्ट्रार विभागात नोंदणी करण्यासाठी प्रवेश देण्याबाबत सूचना जारी करण्यात याव्यात, अशी मागणी गलगली यांची आहे.

पुणे पालिकेने घातला मोठा गोंधळ, कोरोनाच्या संकटात भोंगळा कारभार चव्हाट्यावर

दरम्यान, राज्य एकीकडे अनलॉक होत असताना कोरोनाचा कहरही सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 13,165 नवे कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत. सध्या सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा आवाका वाढला आहे.

Good News: घर घेणं होणार आणखी स्वस्त, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

गेल्या 24 तासांत 9011 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 4,46881 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे. राज्यात 11,62450 रुग्ण विलगीकरण मध्ये आहेत. 37094 संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 19, 2020, 9:03 PM IST

ताज्या बातम्या