Home /News /mumbai /

Mumbai Local Train: मुंबई लोकल सर्वसामांन्यांसाठी कधी सुरू होणार? जाणून घ्या

Mumbai Local Train: मुंबई लोकल सर्वसामांन्यांसाठी कधी सुरू होणार? जाणून घ्या

Mumbai Local train updates: मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे.

    मुंबई, 15 जून: मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगर (Mumbai Suburb) हे कोरोनाचे (Corona) हॉटस्पॉट बनले होते. मात्र, आता कोरोनाची लाट ओसरली असून मुंबई लवकरच कोरोनामुक्त होणार असे दिसत आहे. मुंबईच्या सोबतचा आसपासच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार या भागांतही कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता मुंबईतील लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सर्वसामांन्यांसाठी कधी सुरू होणार? हा प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे. गुरुवारी निर्णय अपेक्षित मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (BMC additional Commissioner Suresh Kakani) यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, येत्या गुरुवारी आपल्याला मुंबई महानगरपालिका आणि आसपासच्या महानगरपालिकेतील रुग्ण संख्येची आकडेवारी मिळेल. या आकडेवारीवरुन राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल. मुंबई मनपाच नाही तर एमएमआर रिजनमधील आकडेवारीचा आढावा घेऊन लोकल ट्रेन सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईन. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण; माजी आमदार विवेक पाटील यांना अटक ...म्हणून मुंबई मनपा लेवल 3मध्ये राज्यातील रुग्णसंख्येत कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता पाच टप्प्यांत अनलॉक करण्याचं सरकारने जाहीर केलं. त्यानुसार बृहन्मुंबई हद्दीत कोविड 19 चा पॉझिटिव्हिटी दर 4.40 टक्के असून ऑक्सिजन बेड्स व्याप्तीचा दर 27.12 टक्के इतका आहे. मात्र, मुंबई शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, मुंबई महानगर प्रदेशातून लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करून मोठ्या संख्येने मुंबईत येणारे प्रवासी तसेच मुंबई शहर परिसरात येत्या काही दिवसांत दिलेला अतिवृष्टीचा इशारा या गोष्टी लक्षात घेता कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई मनपा हद्दीत लेवल 3 चे निर्बंधांबाबत 5 जून 2021 रोजी जारी केलेले नियम पुढील आदेशापर्यंत जसेच्या तसे लागू आहेत. आता येत्या गुरुवारी पुन्हा रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात येणार असून या आकडेवारीवरुन लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार की नाही यावर चर्चा होईल आणि मग निर्णय घेण्यात येईल.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BMC, Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या