महाराष्ट्र अनलॉक कधी होणार? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

महाराष्ट्र अनलॉक कधी होणार? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

हळूहळू सर्व उद्योग धंदे सुरू करण्यात येणार आहे. नवरात्र, दिवाळी सण येऊन ठेपले आहे. त्यामुळे कोविडबद्दल आपल्या सर्वांना आता काळजी घ्यायची आहे.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अनलॉकची घोषणा करत अनेक उद्योग  आणि बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे. पण, अजूनही मंदिर, लोकल रेल्वे सेवा, जीम हे बंद आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कधी अनलॉक होणार याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुर्तास नकार दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरे कारशेड, कोरोनाची परिस्थिती आणि मंदिर उघडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

'लॉकडाउनमध्ये बंद पडलेले अनेक उद्योग आपण एक एक करून सुरू करत आहोत. हळूहळू सर्व उद्योग धंदे सुरू करण्यात येणार आहे. पण कोविडबद्दल आपल्या सर्वांना आता काळजी घ्यायची आहे. त्यामुळे जबाबदारी आपली आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले.

'दारूची दुकानं उघडली पण मंदिरं का उघडली जात नाही, अशी विचारणा विरोधकांकडून  केली जात आहे. विरोधकांना विचारयला काय जाते. पण, ही जबाबदारी आमच्यावर आहे. कोरोना अजून आपल्यातून गेला नाही. जगात काही देशात तर याची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत आहेत. शासनाची जनतेप्रती जबाबदारी आहे. जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नाही. सुरू केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही आणि पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

'एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांच संख्या कमी होत चालली आहे. व्हेंटिलेटर आता उपलब्ध होत आहे. पण  कोरोना हा पसरत चाललेला आहे.  कोरोनाचे रुग्ण आता ग्रामीण भागात वाढत चालले आहे.  काही जणांना कोरोना होऊन गेला असेल. तर काही जणांना सौम्य लक्षणे जाणवत आहे. पण, मधुमेह आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी संघर्षमय ठरत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे', असंही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.

'आपल्या संतांची शिकवण ही आपल्या जगण्याचा आयुष्यभराचा संस्कार आहे. आजही कोरोना आपल्यातून गेला नाही त्यामुळे आतापर्यंत  सर्व धर्मियांनी जसे सगळे सण समारंभ साधेपणाने साजरे केले. आता नवरात्र, दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे हळूहळू आपण दारं उघडत आहोत. उघडलेल्या दारातून सुबत्ता आली पाहिजे, नाहीतर  कोरोना आला तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

'मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचे तंतोतंत पालन करा, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना काळजी घ्या. मला पण गर्दी नकोय पण मास्क हाच आपला ब्लॅकबेल्ट आहे. आपल्या सर्वांना मास्क हा वापरणे बंधनकारकच आहे', असं म्हणत त्यांनी लोकल सुरू करण्याबद्दल नकार दिला आहे.

'आम्ही जे करू जनतेच्या हितासाठी करू, जो काही कायदा आला आहे. त्याबद्दल वेगवेगळ्या संघटना आणि लोकांशी बोलणे सुरू आहे. त्यानंतरच राज्य सरकार निर्णय घेणार आहे. आला कायदा आणि केली अंमलबाजवणी असं होणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी कृषी कायद्याबद्दल स्पष्ट केले आहे.

Published by: sachin Salve
First published: October 11, 2020, 2:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या