Home /News /mumbai /

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे प्रकरणात आता सर्वांचं लक्ष पोलीस चौकशीकडे; शरद पवार म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे प्रकरणात आता सर्वांचं लक्ष पोलीस चौकशीकडे; शरद पवार म्हणाले...

बलात्काराचा आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केव्हा कारवाई करणार याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.

    मुंबई, 15 जानेवारी : बलात्काराच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केव्हा कारवाई करणार याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. शुक्रवारी याबाबत शरद पवार म्हणाले की, पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय पक्षातर्फे करण्यात येईल. (When will action be taken against Dhananjay Munde) सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नामक तरुणीने बलात्काराचा आरोप लावला आहे. यावर मुंडे यांनी ब्लॅकमेल करीत असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या टीममध्ये ACP रँक महिला पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असावा असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. या बैठकीनुसार ठरविण्यात आलं की, सध्या मुंडे यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्यात यावे. पोलीस चौकशी संपल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. धनंजय मुंडेनी रेणू शर्माविरोधात ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे  मनिष धुरी यांनीदेखील रेणू विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ((When will action be taken against Dhananjay Munde)) रेणू शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणात स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असेही तिने यावेळी स्पष्टीकरण दिलं. मनसे नेते मनिष धुरी यांनी देखील तिच्यावर आरोप केले आहेत. कृष्णा हेगडे यांनी असे म्हटले होते की, '2010 पासून ही महिला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पाठिंबा देणाऱ्या गटाची बाजू अधिक मजबूत झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. हे ही वाचा-13 वर्षांच्या मुलाला वेश्याव्यवसायात ढकललं; लिंग परिवर्तनानंतर केला Gang Rape रेणू शर्माने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे व बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'तिने पुढे असं देखील म्हटलं आहे की, कृष्णा हेगडेंनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. (When will action be taken against Dhananjay Munde) त्या पुढे असंही म्हणाल्या आहेत की तुमची हीच इच्छा असेल तर मी माघार घेते. तक्रारदार रेणू शर्माने असं म्हटलं आहे की, 'एक काम करा तुम्ही सर्वांनीच निर्णय घ्या, काहीही माहित नसूनही जे मला ओळखतात किंवा जे ओळखत नाहीत ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून ठरवा, मी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे माघार घेते'.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Dhananjay munde, Sharad pawar

    पुढील बातम्या