'अग्नितांडवा'च्या घटनांमधून तुम्ही शिकलात तरी काय?

कमला मिलला आग लागून आता एक महिना उलटून गेलाय. या महिन्याभरात मुंबई महापालिका आणि मुंबईकर नागरिक म्हणून आपण काय शिकलो.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 31, 2018 11:11 AM IST

'अग्नितांडवा'च्या घटनांमधून तुम्ही शिकलात तरी काय?

प्रणाली कापसे, 31 जानेवारी : कमला मिलला आग लागून आता एक महिना उलटून गेलाय. या महिन्याभरात मुंबई महापालिका आणि मुंबईकर नागरिक म्हणून आपण काय शिकलो. किंवा मंडळी या एकूणच घटनेनंतर आपण आपल्यात काय बदल केले? ज्या आगीत अनेकांचे जीव गेले. त्या आगीचे 'चटके' आपल्यालाही लागले मग यातून आपण काय केलं पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी आपण काय पावलं उचलली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे.

मुंबईतल्या लोअर परळ भागात कमला मिलला आग लागली. 14 जणांचा यात हकनाक बळी गेला. या आगीनंतर मुंबई महानगरपालिकेला जाग आली, आणि कारवाईला सुरुवात झाली.

अग्नितांडवानंतर

- नियमांचं उल्लंघन करणाऱ्यां हॉटेल्सवर कारवाई सुरू

- हुक्का पार्लर्सची पाहणी सुरू

Loading...

- 912 हॉटेल्समधलं अनधिकृत बांधकाम पाडलं

- 16 बार आणि पब सील

- 1601 हॉटेल्सविरोधात आय.आर. दाखल

- आपात्कालीन स्थितीत पाळण्यात येणारी 'स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसीजर' बदलली

- फायर ऑफिसर्सवर अतिरिक्त जबाबदारी

- अनेक आस्थापनांचा कमला मिल सोडण्याचा निर्णय

आता हे सगळं एकीकडे. पण मुंबईकरांनो, जेवणासाठी आपला जीव धोक्यात घालू नका. हॉटेलमध्ये जाल तेव्हा त्याची रचना बघा. अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात आहे का ते पाहा. तुम्ही राहत असलेल्या घराजवळ किंवा इमारतीत एखादातरी फायर एक्सटिंग्यूशर आहे का? फायर एक्झिट आहे का? बरं त्याविषयी तुम्हाली माहिती देण्यात आली आहे का? या सगळ्याचा विचार करा आणि त्यानुसार आपली सुरक्षा आपणच ठेवण्याचा प्रयत्न करा.

आणि शेवटी काय, अशा घटना झाल्यावर वरवरची कारवाई करणं, ही आपल्या व्यवस्थेची सवयच. त्यानं सिस्टममध्ये दीर्घकालीन बदल होतात का? हे बघणं आपलं कर्तव्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2018 11:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...