Home /News /mumbai /

बहुमत चाचणी झाल्यास विधानसभेतील पक्षनिहाय सद्यस्थिती काय? शिंदे गट गैरहजर राहिल्यास काय होईल?

बहुमत चाचणी झाल्यास विधानसभेतील पक्षनिहाय सद्यस्थिती काय? शिंदे गट गैरहजर राहिल्यास काय होईल?

बहुमत चाचणी झाल्यास विधानसभेतील सद्यस्थिती काय आहे. शिवसेना आपलं बहुमत सिद्ध करु शकेल का? या सर्व शक्यतांवर आकडेवारीनुसार नजर टाकूया.

    मुंबई, 29 जून : भाजपच्या शिष्टमंडळाने काल रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. याशिवाय बहुमत चाचणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच बहुमत चाचणी घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र बहुमत चाचणी झाल्यास विधानसभेतील सद्यस्थिती काय आहे. शिवसेना आपलं बहुमत सिद्ध करु शकेल का? या सर्व शक्यतांवर आकडेवारीनुसार नजर टाकूया. महाविकास आघाडी शिवसेना - 16 राष्ट्रवादी काँग्रेस- 53 काँग्रेस - 44 एकूण- 113 भाजप+शिंदे गट शिंदे गट- 39 भाजप- 106 एकूण- 144 मात्र एकनाथ शिंदे यांचा गट बहुमत चाचणीला गैरहजर राहिल्यास परिस्थिती काय असून शकते. असं झाल्यास बहुमताचा आकडा 125 वर येईल. त्यामुळे हा आकडे गाठणे भाजपला सहज शक्य होऊ शकतं. अखेर उद्या 12 वाजता गुवाहाटीतून विमानाचं टेकऑफ; बंडखोर आमदारांचा पुढील मुक्काम?  शिंद गट गैरहजर राहिल्यास भाजप+ - 112 बविआ- 3 शेकाप - 1 शिंदे गटातील अपक्ष- 11 इतर अपक्ष- 2 एकूण- 129 मविआ सरकारकडे काय आहे पर्याय? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली तर सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार हे निश्चित आहे. हाच मुद्दा सोमवारी झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्येही उपस्थित करण्यात आला. विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या 16 आमदारांवर कारवाई करू नये, असा आदेश दिला. कोर्टाने हा आदेश दिल्यानंतर वकिलांनी मधल्या काळात बहुमताची चाचणी घ्यायला सांगितली तर काय करायचं? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना कोर्टाने ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यावर निर्णय कसा द्यायचा म्हणून उत्तर दिलं. तसंच बहुमत चाचणीची परिस्थिती उद्भवली तर पुन्हा कोर्टात या सांगितलं. बहुमतासाठी भाजपचं राज्यपालांना पत्र, पुढचा संघर्ष पुन्हा सुप्रीम कोर्टात! बंडखोर आमदार आपला मुक्काम हलवणार? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 30 जून रोजी राज्यपाल सरकारला बहुमत चाचणीसाठी बोलावू शकते. अद्याप याबाबत राज्यपालांकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. उद्या दुपारी 12 वाजता गुवाहाटीतील बंडखोर आमदार आपला मुक्काम हलवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते सर्वजण विशेष विमानाने निघणार आहे. त्यांनी मुंबईतच आणणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. केंद्रीय पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेत सर्व आमदार मुंबईत येणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या