मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

माझ्या खात्याबद्दल माहिती दिली तर काय चुकलं? विजय वडेट्टीवारांचा नाराजीचा सूर

माझ्या खात्याबद्दल माहिती दिली तर काय चुकलं? विजय वडेट्टीवारांचा नाराजीचा सूर

'आपल्या प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या विभागापुरते बोलावे, विभागाच्या बाहेरची माहिती ही माध्यमांना देऊ नये, याबद्दल समन्वय समितीच्या बैठकीत...'

'आपल्या प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या विभागापुरते बोलावे, विभागाच्या बाहेरची माहिती ही माध्यमांना देऊ नये, याबद्दल समन्वय समितीच्या बैठकीत...'

'आपल्या प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या विभागापुरते बोलावे, विभागाच्या बाहेरची माहिती ही माध्यमांना देऊ नये, याबद्दल समन्वय समितीच्या बैठकीत...'

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 06 जून : राज्यात लॉकडाऊन (Lockdown) हटवण्याच्या मुद्यावरून महाविकास आघाडीमधील (MVA Goverment) मतभिन्नता चव्हाट्यावर आली. पण, जर आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जर शाळांच्या परीक्षा होणार की नाही, याबद्दल बोलत असतील तर मी माझ्या खात्याबद्दल माहिती दिली तर त्यात काय चुकीचं? असा सवाल मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी काँग्रेसश्रेष्ठींकडे (Congress) केली असल्याची माहिती समोर आली आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून निर्बंध शिथिल करण्यासाठी बैठक झाली होती. याची संपूर्ण कल्पना ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी याबद्दलची सूचना अधिकाऱ्यांना सुद्धा दिली होती. त्यानुसारच अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाच्या बैठकीत चर्चेला आला. या बैठकीला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, मुख्य सचिव हजर होते. पण, या प्रस्तावाला अंतिम स्वरुप प्राप्त झाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर करणार होते. पण, विजय वडेट्टीवार यांनी बारावीच्या परीक्षाबद्दल सांगत असताना अनलॉकची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: घोषणा करत असता. पण विजय वडेट्टीवार यांनी माहिती जाहीर केल्यामुळे अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार यांच्याकडे या प्रकरणाबद्दल विचारणा केली. त्यावेळी वडेट्टीवार यांनी आपली बाजू मांडत नाराजी व्यक्त केली होती. राजेश टोपे हे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत. पण ते अनेक विषयांबद्दल बोलतात. त्यांना कुणीही काही बोलत नाही. मग मी बोलल्यानंतर एवढा गोंधळ कशाला? असं सांगत वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली.

लातूरात सुनेनं केला सासूचा खून, संशयाची सुई फिरताच हत्येचा झाला उलगडा

परंतु, दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडेट्टीवार यांनी ज्या घोषणा केल्या होत्या, त्याच नियमांची अंमलबाजवणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद नाही, असा अर्थ निघू नये म्हणून एकाप्रकारे प्रकरणावर पडदा टाकला. दरम्यान, आपल्या प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या विभागापुरते बोलावे, विभागाच्या बाहेरची माहिती ही माध्यमांना देऊ नये, याबद्दल समन्वय समितीच्या बैठकीतमध्ये चर्चा होणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली.
First published:

Tags: Vijay wadettiwar

पुढील बातम्या