मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

जामीन मिळाल्याचं वृत्त ऐकताच आर्यन खाननं अशी दिली Reaction,अधिकाऱ्यांना म्हणाला...

जामीन मिळाल्याचं वृत्त ऐकताच आर्यन खाननं अशी दिली Reaction,अधिकाऱ्यांना म्हणाला...

संध्याकाळी 6 वाजता आर्यन खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळाल्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती?

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 29 ऑक्टोबर: बॉलिवूड (Bollywood actor) अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. आर्यन खानसह (Aryan Khan) अरबाज (Arbaaz) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. संध्याकाळी 6 वाजता आर्यन खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळाल्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती? कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानला संध्याकाळी 6 वाजता जेवण देताना जामीन मिळाल्याची माहिती मिळाली. त्यावर आर्यन हसला आणि तुरुंग कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आर्यनला जामिनाची बातमी मिळाल्यावर तो खूप खूश (very happy) झाला.

कशी होती आर्यन खानची प्रतिक्रिया?

कारागृह प्रक्रियेस एक, दोन किंवा अर्धा तास लागतो. आर्यन खाननं रात्री उशीरापर्यंत जेवण केलं नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खाननं त्याच्या बॅरेकमधील काही कैद्यांशी ओळख केली होती. आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी कळताच तो त्या कैद्यांकडे गेला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आणि सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलं.

हेही वाचा- BJP ला मोठा झटका, 'या' निवडणुकीत एकनाथ खडसेंचा विजय निश्चित

सलग तीन दिवस आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्याचा निर्णय घेतला. कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच आर्यन, अरबाज, मुनमुन तुरुंगातून बाहेर पडू शकणार आहेत. तिघंही शुक्रवारी किंवा शनिवारी तुरुंगातून सुटू शकतील. आर्यन खानच्या वकिलांना तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर स्टारकिडला जामीन मिळवून देण्यात यश आलं आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज दोनदा फेटाळला होता.

नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया

गुरुवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आर्यनला जामीन मंजूर झाला. त्यानंतर नवाब मलिक यांनी 5 वाजून मिनिटांनी एक ट्विट केलं. त्यांनी प्रतिक्रियाही फिल्मी स्टाईलमध्ये आहे. 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' एवढंच ट्विट त्यांनी केलं.

हेही वाचा- धनत्रयोदशीच्या आधीच शुक्राचं राशी परिवर्तन; या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक 

मात्र रात्र तुरुंगातच

गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह, मुनमुन धमेचा आणि अरबाज खान यांना जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी कालची रात्र आर्यनला तुरुंगात राहावं लागलं. या तिघांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरच्या पहाटे एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. यांना अटकेत घेतल्यानंतर तिघांनाही 25 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे.

First published:

Tags: Aryan khan, Shah Rukh Khan