Home /News /mumbai /

केसरकर कसले प्रवक्ते झाले, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, अजितदादांचा टोला

केसरकर कसले प्रवक्ते झाले, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, अजितदादांचा टोला

तिकडे बसलेले आमचे मान्यवर पाहून भाजपच्या नेत्यांचं वाईट वाटतं. आमच्याकडील ही मंडळी तिकडे जाऊन मोठ्या पदावर बसली आहे.

तिकडे बसलेले आमचे मान्यवर पाहून भाजपच्या नेत्यांचं वाईट वाटतं. आमच्याकडील ही मंडळी तिकडे जाऊन मोठ्या पदावर बसली आहे.

तिकडे बसलेले आमचे मान्यवर पाहून भाजपच्या नेत्यांचं वाईट वाटतं. आमच्याकडील ही मंडळी तिकडे जाऊन मोठ्या पदावर बसली आहे.

    मुंबई, 03 जुलै : आज सभागृहात समोरच्या बाकावर आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त पाहायला आहे. तिकडे बसलेले आमचे मान्यवर पाहून भाजपच्या नेत्यांचं वाईट वाटतं. आमच्याकडील ही मंडळी तिकडे जाऊन मोठ्या पदावर बसली आहे. जर पहिली लाईन पाहिली तर गणेश नाईक, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि मुख्यमंत्री महोदय तुमच्या मागे बसलेले दीपक केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले आहे. म्हणजे, त्यावेळी आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी जोरदार टोला लगावला. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलस असताना अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'मी जेव्हा या सभागृहामध्ये पाहतो, त्यावेळी मुळच्या भाजपच्या मान्यवरांची संख्या कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त पाहायला आहे. तिकडे बसलेले आमचे मान्यवर पाहून भाजपच्या नेत्यांचं वाईट वाटतं. आमच्याकडील ही मंडळी तिकडे जाऊन मोठ्या पदावर बसली आहे. जर पहिली लाईन पाहिली तर गणेश नाईक, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि मुख्यमंत्री महोदय तुमच्या मागे बसलेले दीपक केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले आहे. म्हणजे, त्यावेळी आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, असा टोलाही अजितदादांनी लगावला. 'देवेंद्र फडणवीस हे टीव्हीवर बोलत होते. आता मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील. असं ऐकताच एकच शांतता पसरली आणि भाजपचे नेते खळखळा रडायला लागले. कुणाला काही कळेना, संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. कुणालाच काही कळेना. गिरीश महाजन यांचं अजून रडणं थांबेना. ते अजूनही बांधलेला फेटा काढताय आणि डोळे पुसत आहे. खऱ्या अर्थाने इतकं वाईट वाटत आहे की आता काही करू शकत नाही, असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली. 'भाजपचे आज 105 आमदार आहे. पण सद्सदविवेक बुद्धीला विचारून एकदा सांगा की खरंच समाधान झालं आहे का, चंद्रकांत दादा बाकडं जास्त वाजवू नका, तुमचं मंत्रिपद येईल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे कुठे आता बाकडं वाजवू नका, असा टोलाही अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. 'आमच्याकडून 30-40 आमदार गेले आहे. त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही. हे आता बघावे लागणार आहे. खरंतर एकनाथ शिंदे आणि आपण बरीच वर्ष काम केली आहे. तुम्ही जर माझ्या कानात जरी सांगितलं असते की उद्धव ठाकरेंना सांगा की अडीच वर्ष झाली, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. तर मीच तुम्हाला तिथे बसवलं असतं काही प्रॉब्लेमच झाला नसता. काहीच अडचण नसती. आदित्य ठाकरे काही अडचण आली नसती ना, असंच अजितदादांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंना विचारलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या