Home /News /mumbai /

सुरतेच्या प्लॅनचं असं कुठलं गुपित मुख्यमंत्री शिंदेंनी केलं उघड; फडणवीसांसह सगळे गुपचूप हसले

सुरतेच्या प्लॅनचं असं कुठलं गुपित मुख्यमंत्री शिंदेंनी केलं उघड; फडणवीसांसह सगळे गुपचूप हसले

सुरतेच्या प्लानबद्दल बोलताना ते म्हणाले...आम्ही राज्याच्या सीमेच्या बाहेर होतो.

    मुंबई, 4 जुलै : आतापर्यंत शांत दिसणाऱ्या एकनाथ शिंदेंनी विधानसभेत फटकाऱ्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी अत्यंत खुलेपणाने सुरतच्या प्लान विषयी बोलले. आम्ही कोणत्याही आमदाराला जबरदस्तीने आणलं नाही. सर्वजणं आपल्या मनाने आले आहेत. नितीन देशमुखला मी मुंबईला पाठवलं. मी त्याच्यावर जबरदस्ती केली नाही. सुरुवातीला मी गेलो तेव्हा 29 जणं होतं. त्यानंतर आणखी 15 ते 20 जणं वाढले. सुरतेच्या प्लानबद्दल बोलताना ते म्हणाले...आम्ही राज्याच्या सीमेच्या बाहेर होतो. त्यावेळी टॉवर लोकशन होते. आयजीला सांगून नाकाबंदी केली. मीही बरीच वर्ष काम केली. मलाही माहिती आहे, कसं निघायचं आहे ते. त्यावेळी अजितदादांनी विचारलं सगळं काही सांगा...पण तुम्ही आता माझ्याकडून सगळं काही काढून घेऊ नका, खासगीमध्ये सांगतो सगळं, मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हीही निघून जायचे. आतापर्यंतच्या भाषणात त्यांनी अनेक गुपितं उघड केली होती. त्यानंतर ते पुढील टप्प्याबद्दल बोलणार इतक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हटकलं, आणि सर्व सांगू नका असंही म्हणाले. आणि स्वत: हसू लागले. हे पाहून अख्खाय विधानसभेत हश्या पिकला. आपल्या अनोख्या शैलीत एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाबरोबरच विरोधी पक्षालाही आपलसं केलं. अजित पवारांचं कौतुक.. यावेळी शिंदेंनी अत्यंत खुलेपणाने अजित पवारांचं कौतुक केलं. त्यांचं भाषण, वागणूक, रोखठोक पद्धत आवडत असल्याचंही शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदें यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे... समृद्धी महामार्गांचं काम सुरू झालं तेव्हा आंदोलनं झाली होती. मी बुलढाण्याला चाललो होतो. त्यावेळी आमचं विमान क्रॅश होणार होतं. आमचा कार्यक्रम होणार होता. शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि लगेच पैसे दिले. पण, आम्ही ज्या विमानात चाललो होतो, त्या पाठीमागून दुसरे विमान गेले होते. फडणवीस यांनी मला काम करण्याची संधी दिली. फडणवीस हे शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देणार होते. भिवंडीमध्ये नितीन गडकरी आले होते, त्यावेळी त्यांनी मला पद देणार असं सांगितलं होतं. एमएसआरडीसीच्या माध्यमातून 6000 कोटी कर्ज माफ केले आता आम्ही फायद्यात होतो. पुण्यात रिंगरोड करणार आहोत, दादा आम्ही तुमचं काम करणार आहोत, तुम्ही जरी तिकडे असला तरी करणार आहे. आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे, भास्कर जाधव आम्ही गद्दार नाही. जो काही निर्णय घेतला आहे, वैयक्तिगत मला काही स्वार्थ नव्हता. सुरुवातील मला मुख्यमंत्री करणार ही वस्तुस्थितीत होती. पण अजितदादा की कुणी तरी सांगितलं, एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री नको म्हणून सांगितलं. त्यानंतर मला सांगितलं तुम्हीच मुख्यमंत्री होणार आहे. सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांचा किस्सा सुरू होता, त्यावेळी मी अजितदादांना विचारला, त्यावेळी त्यांनी पक्षातूनच विरोध होता असं सांगितलं गेलं. त्यानंतर मी विसरलो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या