Elec-widget

कोट्यधीश आहेत सेनेचे युवराज; बॉन्ड शेअर्स, दागिने इतकी आहे मालमत्ता

कोट्यधीश आहेत सेनेचे युवराज; बॉन्ड शेअर्स, दागिने इतकी आहे मालमत्ता

आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीची एकजूट दाखवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित रहाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

  • Share this:

वरळी (मुंबई), 03 ऑक्टोबर : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिले ठाकरे ठरले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंब उपस्थित होते. हा अर्ज भरण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीची एकजूट दाखवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित रहाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण मुख्यमंत्र्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी ९ वाजता लोअर परळ इथल्या 'शिवालय' या शिवसेना शाखेपासून आदित्य ठाकरे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक निघाली. त्यानंतर त्यांनी वरळी इथल्या बीएमसी इंजिनियरिंग हबमधील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

किती आहे आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती

- 11 कोटी 38 लाख ऐवढी आदित्या ठाकरेंची एकूण संपत्ती आहे

- यात एक बीएमडब्ल्यू गाडी ज्याची किंमत 6 लाख 50 हजार आहे

Loading...

- दोन व्यावसायिक गाळे

- कर्जत खालापूर इथे काही गुठें जमीन

- बॅंकेतल्या ठेवी 10 कोटी 36 लाख

- डिव्हीडंट शेअर आणि काही दागिने

- 10 लाख 22 हजार इतर

- 64 लाख 65 हजार दागिने

इतर बातम्या - नवरात्रीत मोठ्या हल्ल्याची शक्यता, दिल्लीत घुसले 4 दहशतवादी; देशभरात हाय अलर्ट

दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आदित्यवर आपले प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम राहू द्या' असं उद्धव ठाकरे म्हणालेत आहेत. राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी त्यांचे आभार मानलेत. ज्यांनी-ज्यांनी निवडणुकीत आदित्यला मदत केली त्या सर्वांचे आभार असं उद्धव ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या - तुम्हाला नको तर आम्हाला द्या! भाजपने नाकारलेल्या उमेदवाराला NCPने दिलं तिकीट

संपूर्ण ठाकरे कुटुंबात निवडणूक लढणारे आदित्य ठाकरे हे पहिले आहेत. त्यामुळे त्यांनी सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. आदित्य ठाकरेंनी अर्ज भरण्यापूर्वी मातोश्रीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत जाऊन त्यांच्या फोटोला नमस्कार केला. आदित्य ठाकरेंनी अर्ज भरायला निघण्यापूर्वी ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2019 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...